आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 58% Student Having Health Issues Due To Weight Of School Bag

दप्तराचे ओझे : हायकोर्ट म्हणाले, मुलांना ट्रॉली बॅग घेऊन जावे लागेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांच्या वजनाच्या 10% हून जास्त असू नये दप्तराचे ओझे.
प्रत्यक्षात 35% पेक्षा जास्त दप्तराचे वजन.
58% मुलांत ओझ्यामुळे मान, कंबर, पाठदुखीचे आजार

मुंबई - देशातील ५८ टक्के शाळकरी मुले दप्तराच्या ओझ्यामुळे आजाराला बळी पडत आहेत. महाराष्ट्र सरकारने स्थापलेल्या एका समितीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. त्यावर सध्या मुले पाठीवर जेवढे दप्तराचे ओझे नेत आहेत, तेही कमी वाटू लागल्याने लवकरच त्यांना शाळेत ट्रॉली बॅग घेऊन जावे लागेल, असे मत न्यायालयाने नोंदवले.

दप्तराच्या ओझ्यामुळे १० वर्षांखालील मुलांना हाडांचे आजार होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ‘शाळेत मुलांना दररोज सर्व विषय शिकवले जातात. त्यामुळे त्यांना दररोज सर्व वह्या-पुस्तके न्यावी लागतात. अशा वेळापत्रकात बदल झाला पाहिजे,’ असे न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला म्हणाले.

दप्तराच्या ओझ्यापासून शाळकरी मुलांची सुटका करण्यासाठी शाळेतच लॉकर देण्याचा सरकारचा विचार आहे, असे सुनावणीदरम्यान सरकारने सांगितले. त्यावर ‘मुलांना खूपच होमवर्क करत असल्यामुळे पालकांना घरच्यासाठी एक व शाळेसाठी एक असे वह्या-पुस्तकांचे दोन-दोन सेट्स खरेदी करावे लागतील,’ असे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे म्हणाले.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ई-क्लासरूम आणि दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या वापर करण्याची समितीची सूचना आहे. त्यावर सूचना खूपच चांगल्या आहेत, त्या शक्य तितक्या लवकर लागू करा, अशी सूचना न्यायालयाने केली. समितीच्या शिफारशी केव्हा लागू होतील, याबाबत येत्या २३ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान सरकारला न्यायालयात सांगावे लागणार आहे.