आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्याची नवलाई संपताच भांड्याला लागले भांडे, 58 वर्षीय पतीची 20 वर्षीय पत्नी बेपत्ता!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- संसारातील नव्याची नवलाई संपताच घरात भांड्याला भांडे लागते. नवरा-बायकोचे शुल्लक कारणावरून खटके उडतात, याला ठाण्यातील 'ग्लोबल कपल' देखील अपवाद ठरू शकले नाही. लग्नाला सहा महिने पूर्ण होत नाही तोच 58 वर्षीय सतिश आपटे यांची 20 वर्षीय पत्नी लीसा बेपत्ता झाली आहे.

ठाण्यात राहणारे पत्रकार सतिश आपटे यांनी पत्नी हरवल्याची तक्रार नौपाडा पोलिसात दिली आहे. माहेरी जाते असे सांगून लिसा 30 जूनला घराबाहेर पडली होती. एक-दोन दिवस उलटले तरी लिसा घरी परतली नाही. त्यावर आपटे यांनी लिसाच्या माहेरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपटे यांनी अखेरीस पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिस लिसाचा शोध घेत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सतिश आपटे आणि लिसाचे असे जुळले होते सूत...
बातम्या आणखी आहेत...