आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सिलिंडरचा स्‍फोट; इमारतीला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्‍यू तर 12 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जुहु परिसरातील बांधकाम सुरु असलेल्‍या 13 मजली इमारतीला आग लागल्‍यामुळे 6 जणांचा मृत्‍यू झाला आहे. काल (बुधवारी) मध्‍यरात्री इमारतीच्‍या तळमजल्‍यावर सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे ही आग काही क्षणात संपूर्ण इमारतीत पसरली.

स्‍फोट एवढा भीषण होता की यात 6 जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये 5 कामगार आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेत 12 जण गंभीर जखमी झाले असून त्‍यांच्‍यावर कूपर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.   
 
कशी झाली दुर्घटना? 
- जुहू परिसरातील विलेपार्ले येथील जेव्हीपीडीमध्ये 'प्रार्थना' या 13 मजली इमारतीच बांधकाम सुरू आहे. इमारतीच्‍या तळमजल्‍यावर जेथे बांधकामाचे सामान ठेवलेले आहे, तेथे प्रथम आग लागली. कामगारांचे घर त्‍याच्‍या बाजुलाच असल्‍याने ते देखील आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 
- मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितली आहे. मात्र ते सर्वजण कामगार असल्‍याचे सांगितले जात आहे. 
- नेमका सिलिंडरचा स्‍फोट कशामुळे झाला, याचा तपास सुरु असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

मृतांची संख्‍या वाढण्याची शक्यता...
- पोलिसांनी सांगितले आहे की, जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍यामुळे मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. 
- जखमींवर महापालिकेच्‍या कूपर रुग्‍णालयात उपचार सुरु आहे.  
 
प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले, आधी जोरदार ब्लास्ट झाला; नंतर इमारतीत आग पसरली 
- घटनास्‍थळावर उपस्थित एका व्‍यक्‍तीने सांगितले की, आधी स्‍फोटाचा प्रचंड आवाज ऐकू आला. त्‍यानंतर काही क्षणातच इमारतीत आग पसरल्‍याचे दिसले.
- नंतर परिसरातील लोकांनी ताबडतोब याबाबत पोलिस आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली. 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जुहूमध्ये इमारतीला लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...