आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून एकाच कुटुंबातील 6 जण बेपत्ता; अमरावतीमधील सूनने केली ईमेलद्वारे तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरार येथील शर्मा कुटूंब 15 ऑक्टोंबरपासून गायब आहे. - Divya Marathi
विरार येथील शर्मा कुटूंब 15 ऑक्टोंबरपासून गायब आहे.
मुंबई- नाशिकला देवदर्शनासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले एका कुटूंबातील 6 जण बेपत्ता झाले आहेत. संगीता शर्मा नावाच्या एका महिलेने याबाबत तक्रार केली आहे. शर्मा कुटुंबीय गाडीत बसून 15 दिवसांपूर्वी विरारच्या ग्लोबल सिटीमधून पहाटे साडेतीन वाजता निघाले पण परतलेच नाहीत. शर्मा कुटुंब सीसीटीव्हीत अखेरचे तेथेच कैद झाले आहे, पण पुढे त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
 
शर्मा कुटुंबियांची सून संगीता शर्मांनी अमरावतीतून ईमेलद्वारे कुटुंबीय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल दिली आहे. 15 दिवसांपासून सासरचे 6 जण बेपत्ता असल्याचे त्या सांगतात.
विरारच्या ग्लोबल सिटी, एव्हेन्यू जे या सोसायटीमध्ये शर्मा कुटुंबीय राहायचे. सून संगीता शर्मा बाळंतपणासाठी अमरावतीमध्ये होत्या. 15 जूनला त्यांना मुलगी झाली. तर 11 ऑक्टोबरला पती वरुण शर्मा त्यांना भेटायलाही गेले होते. 
 
विरार पश्चिमेला वरुण शर्मा, त्यांची पत्नी संगीता शर्मा, दीर अश्विनी शर्मा आणि संगीताची सासू अनिता शर्मा राहतात. तर विरार पूर्वेला रश्मी गार्डन येथे संगीताच्या पतीचे काका सतीशचंद्र शर्मा, त्यांची पत्नी आणि मुलगी प्रियंका हे सर्वजण राहतात.
 
शर्मा कुटुंबातील सर्व जण उच्चशिक्षित आहेत. वरुण आणि अश्विनी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करायचे, तर काका नामांकित कंपनीसाठी आणि घराच्या विक्रीसाठी एजंट म्हणून काम करायचे. पोलिसांनी शर्मा कुटुंबियांचा शोध सुरु केला आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...