आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्ब शब्द ऐकून सहप्रवाशांनी पोलिसांना कळवले, 6 ताब्यात; \'बॉम्बे\' म्हणाल्याचा संशयितांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवाश्यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. - Divya Marathi
प्रवाश्यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई - सीएसटी स्थानकावर रेल्वे पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना प्रवाश्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पकडले आहे. सगळेच केरळचे असलेले हे संशयित पनवेल ते सीएसटीला जात असताना मल्याळी भाषेत बॉम्बे-बॉम्बे असे म्हणत होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाश्यांना ते बॉम्ब म्हणत असल्याचे वाटले. त्यांनीच याबाबतची तक्रार रेल्वे पोलिसांकडे केली. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. 
 
व्हिडिओ आणि कागदपत्रे जप्त
- रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 6 जणांनी सांगितल्याप्रमाणे, ते प्रथमच मुंबईला आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 संशयास्पद व्हिडिओ आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांमध्ये अनेक अमेरिकन नागरिक मोरोक्को येथे जमणार असे नमूद आहे. तर, एका ठिकाणी 'मी मेलो तर अल्लाह मला माफ कर' असेही लिहिण्यात आले होते. 
- पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रांचे तज्ञांकडून भाषांतर केले जात आहे. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृतरीत्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...