आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64 Witness List Made In The Case Of Salman Hit And Run

सलमानचे हिट अँड रन खटल्याप्रकरणी सरकारने तयार केली 64 साक्षीदारांची यादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन खटल्याप्रकरणी सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने उच्च न्यायालयात दाद मागण्यासंदर्भात अजूनही भूमिका स्पष्ट न केल्यामुळे अखेर सरकारी पक्षाने या खटल्याच्या पुनर्सुनावणीसाठीच्या 64 साक्षीदारांची यादी आज मुंबई सत्र न्यायालयात सादर केली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरून हे प्रकरण हेतुपुरस्सर लांबणीवर टाकले जात आहे का, असा संशय निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची पुनर्सुनावणी करावी या मॅजिस्‍ट्रेट कोर्टाच्या निर्णयानुसार आज सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने 64 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली आहे. पुराव्यांच्या स्वरूपात जी कागदपत्रे सादर केली जाणार आहेत त्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असून सर्व साक्षीपुराव्यांची तपासणी आता या खटल्याच्या पुनर्सुनावणीच्या वेळी केली जाणार आहे.
या खटल्याच्या पुनर्सुनावणीबाबतच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी किंवा नाही याबाबत राज्य सरकारने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याची बाब सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर राज्य सरकारची भूमिका जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण खटल्याच्या पुनर्सुनावणीची प्रक्रिया सुरू करू, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता 12 फेब्रुवारीला होणार आहे.