आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी मुंबईत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छानदार संचलन करण्यात आले. मुंबईतील दादरवरील शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडला. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह अनेक नेते, अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस दल, नेव्ही, होमगार्ड, वाहतूक नियंत्रण कक्ष, एन.सी.सी. अशा विविध दलांनी संचलन केले. तसेच, शासनाच्या उद्योग, नगरविकास, जलसंधारण, वने, ऊर्जा, कृषी, गृहनिर्माण, महसूल या विभागांच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.
गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनाच्या (1 मे 2014) उत्कृष्ट पथकांपैकी दंगल नियंत्रक पथक, महिला पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.8 व 11 यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला केंद्राच्या 52 तुकड्या आणि विविध विभागाचे आठ चित्ररथांनी संचलन केले. या कार्यक्रमात तीन हजार जवानांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. या सोहळ्यासाठी सुमारे 1400 पाहुण्यांना निमंत्रित केले होते तर, तीन हजार नागरिकांना पासेस देण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याची वैशिष्ट्ये
- नौदल, भूदल आणि सीआयएसएफच्या 27 पथकांचे संचलन
- पोलिस, होमगार्ड, नागरी संरक्षण दलाच्या 24 पथकांचे संचलन
- वाहतूक पोलिसांच्या 27 तुकड्यांचे मोटरसायकलवर फिरते संचलन
- पोलिसांच्या दहा विविध प्रकारच्या वाहनांचे संचलन
- अग्निशमन दलाच्या दोन अत्याधुनिक गाड्यांचे संचलन
- सोहळ्यात समाविष्ट होणारे चित्ररथ
- उद्योग- "मेक इन महाराष्ट्र' विषयावरील चित्ररथ
- नगरविकास- प्रगतीचा वेग नवा
- रोजगार हमी योजना- जलयुक्त शिवार अभियान
- वन विभाग- संजय गांधी उद्यान चित्ररथ
- ऊर्जा- वीज विकासाची जननी
- महसूल- गतिशील शासन आणि पारदर्शी प्रशासन
- गृहनिर्माण- सामाजिक बांधिलकीची जाणीव- परवडणारी घरे .