आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुहागरच्या समुद्रात सात जण बुडाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नातेवाइकांकडे आलेले मुंबईतील सात जण गुहागर येथील समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी घडली. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह शोधण्यात जीव रक्षकांना यश आले आहे. उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे. सुफियान शेख (१५) आणि मारिया चांडा (१४) अशी मृतांची नावे आहेत.

मुंबईतील चेंबूर येथील शेख कुटुंबीय चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे नातेवाइकांकडे आले होते. सकाळी शेख कुटुंब आणि त्यांचे नातेवाइक गुहागर समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. या वेळी ते समुद्रात बुडाले.