आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 7 आयएएस अधिका-यांच्या बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला. महापालिका प्रशासन विभागाच्या संचालकपदी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची नियुक्ती झाली आहे. तानाजी सत्रे यांच्याकडे विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे संचालक विकास खारगे यांच्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीवर राज्याबाहेर असलेले के. एच. गोविंदराज यांना पाठवण्यात आले आहे. राजेश कुमार यांची पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सोनिया सेठी यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी आबासाहेब ज-हाड नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतील.