आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Special Executives Officers Get Governmental Houses

अधिकाऱ्यांना नियमबाह्य सरकारी घरे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा केला गैरवापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्यांच्या ७ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना (ओएसडी) शासकीय निवासस्थान दिले असल्याची माहिती आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य शासनाकडून ही माहिती विचारली. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव शि.म.धुळे यांनी या ओएसडींची यादी दिली. १९९५ च्या धोरणात कुठेही त्या बाहेरील उमेदवारांना शासकीय निवासस्थान देण्याचा उल्लेखही नाही. १० टक्के विशेष बाब करण्याचे अधिकार आणि १ किंवा २ टप्पे वरच्या दर्जाचे निवासस्थान वाटप करण्याच्या मुख्यमंत्री यांना असलेल्या अधिकारानुसार वाटप झाल्याचा दावा धुळे यांनी केला आहे.

कोण आहेत हे भाग्यवान? : सर्वात मोठे शासकीय निवासस्थान श्रीकांत भारतीय यांना मलबार हिल, रॉकी हिल टॉवर येथे दिले गेले असून ते १ हजार ६३५ चौरस फुटांचे आहे. त्यानंतर चर्चगेट येथे प्रत्येकी ८३० चौरस फुट क्षेत्रफळाचे निवासस्थान रविकिरण देशमुख( आसावरी-१०३) आणि कौस्तुभ धवसे (आसावरी-१०४) यांना देण्यात आले आहे. २० फेब्रुवारी २०१६ रोजी धवसे यांनी निवासस्थान रिक्त केले आहे. निधी कामदार यांना चर्चगेट येथील मंदार-३ मध्ये ७५० चौरस फुटांचे निवासस्थान दिले आहे. मलबार हिल येथील बैंडमन्स क्वाटर्स येथे ७०० चौरस फुटांचे निवासस्थान केतन पाठक, सुमीत वानखेडे आणि अभिमन्यू पवार यांना देण्यात आले आहे.
बाहेरील अशासकीय उमेदवारांना भरगच्च वेतन आणि त्यानंतर शासकीय निवासस्थान देण्याची नवीन परंपरा चुकीचे असून त्यामुळे शासकीय अधिकारीवर्गाची हेळसांड होत असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.
पुढे वाचा.. प्रतीक्षा यादी दिली नाही