आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalyan Extortion Case, 7 Years Old Nayan Jain\'s Found Dead Body

अपहरण झालेल्या नयनची हत्याच, मृतदेह सापडला नदीत;नोकरीतून काढल्याने कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- मृत नयन जैन - Divya Marathi
छायाचित्र- मृत नयन जैन
मुंबई - कल्याणमधील अपहरण झालेल्या 7 वर्षीय नयन जैनचा मृतदेह आज दुपारी मुरबाड येथील नदीत सापडला. नयन जैनचे काल (बुधवारी) दुपारी कल्याणमधून अपहरण झाले होते. त्यानंतर नयनच्या वडिलांनी कल्याण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी नयन याच्या कुटुबियांना फोन करून खंडणी मागितली. 15 लाखांची खंडणी देण्याच्या बदल्यात नयनला सुखरूप पोहचवू असे अपहरणकर्त्यांनी सांगितले.
या प्रकारानंतर नयनच्या वडिलांनी 15 लाखांची खंडणी या तिघांकडे पोहचवली. मात्र, तरीही नयन पोहचला नाही. त्यानंतर नयनच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले. हे आरोपी जैन यांच्या दुकानातच काम करीत असलेले युवक निघाले. या तिघांना गैरवर्तनामुळे आपल्या दुकानातून जैन यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढून टाकले होते. त्याचा बदला घेण्यासाठीच नयनचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
कल्याण पोलिसांनी आरोपी राजेंद मोरे, विजय दुबे व खुशवाह या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, चौकशीत सर्व बाबींचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.