मुंबई- ठाण्यातील मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी रात्री एकाच वेळी छापेमारी केली. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून ही देशातील सर्वात मोठी कारवाई आहे.
मिळालेली माहिती अशी की, बोगस कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करुन टॅक्स रिव्हिजनच्या नावाखाली लाखो रुपयांत गंडवले जात होते. पॉलिसीच्या नावाने लोकांच्या अकाऊंटची गोपनीय माहिती गोळा करुन त्यातून रक्कम पळवण्याचे काम या कॉल सेंटर्समधून चालत असल्याची गोपनिय माहिती मिळाली आहे. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, बोगस कॉल सेंटरमध्ये खुलेआम चालत होते असे काम...