आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 11 Mumbai Blasts: Prosecution Seeks Death For Eight

७/११ बॉम्बस्फोटातील दोषींना फाशीच द्या, ३० सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील लोकल रेल्वेत ११ जुलै २००६ च्या झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषींना विशेष मकोका न्यायालय ३० रोजी शिक्षा सुनावणार आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी यातील १२ पैकी ८ आरोपींना फाशी, तर चौघांना मरेपर्यंत जन्मठेप देण्याची मागणी केली आहे. या एकुण खटल्यात १३ आरोपी होते. त्यातील अब्दुल वाहिद हा निर्दोष सुटलेला आहे.

या खटल्याची सुनावणी २००७ मध्ये सुरू झाली होती. सरकारी पक्षातर्फे १९२, बचाव पक्षातर्फे ५२ साक्षीदार आणि एक न्यायालयीन मित्र अशा एकूण २४५ जणांची साक्ष या खटल्यात नोंदवण्यात आली. साडेपाच हजार पानांचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले असून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण हेण्यास तब्बल ९ वर्षे लागली आहेत. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वेवर ११ जुलै २००६ रोजी काही मिनिटांच्या कालावधीत लागोपाठ सात बॉम्बस्फोट झाले होते. माहीम, वांद्रे, खार, जोगेश्वरी, बोरिवली, भाईंदर आणि मीरा रोड या स्थानकांच्या परिसरात लोकल गाडयांमध्ये ११ मिनिटांच्या अंतराने झालेल्या या बॉम्बस्फोटांत १८८ लोकांचा बळी गेला होता, तर ८२९ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांचा तपास एटीएसचे तत्कालीन प्रमुख के. पी. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने करून १३ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते.
‘चौघांना द्या मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा’
१. मोहम्मद मजिद मोहम्मद शफी (पाकिस्तानी दहशतवाद्यांना बांगलादेशमार्गे मुंबईत आणले.)
२. मुजम्मील अतउर रहमान शेख (लोकल गाड्यांचे सर्वेक्षण केले), ३. शेख सोहेल मेहमूद शेख (पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले.) ट्रेनिंग घेतले), ४. जमीर अहमद रेहमान शेख ( फैजलकडील बैठकीत सहभाग) यांना मरेपर्यंत जन्मठेप द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या स्फोटाचे फोटो आणि वाचा दोषींची नावे, कुणी आणले अतिरेक्यांना भारतात, कुणी बनवला घरात बॉम्ब, आणि पेरला रेल्वेत बॉम्ब...