आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 73 IAS Officers Transferred In Maharashtra, See Attached List...

मुख्यमंत्र्यांनी फिरवली भाकरी; मंत्री-सचिव वाद, 73 अधिका-यांच्या \'होलसेल\' बदल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर जिल्ह्यात धडाडीने काम करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई पालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. - Divya Marathi
सोलापूर जिल्ह्यात धडाडीने काम करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई पालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
मुंबई- फडणवीस सरकार येऊन दीड वर्ष होत असताना मंत्री व सचिवांमधील वाद तसेच स्वपक्षीय आमदारांची नाराजी या कारणामुळे अद्याप सरकारची घडी बसली नसल्याने शेवटी मुख्यमंत्र्यांनी भाकरी साफ करपून जाण्याअगोदर फिरवण्याचा निर्णय घेतला आणि एकाच वेळी ७३ प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला.

सुधीर मुनगंटीवार, रामदास कदम, िगरीश बापट, राजकुमार बडोले, िदवाकर रावते, िवनोद तावडे, पंकजा मुंडे हे कॅबिनेट मंत्री आपापल्या िवभागातील सचिवांच्या कामगिरीवर समाधानी नव्हते. मंत्र्यांचे निर्णय मान्य न करता सचिव मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून कामे अडवून ठेवत असल्याचे िदसून आले होते. याविषयी संबंिधत मंत्र्यंानी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आवाजही उठवला होता. सचिव आमचे एेकणार नसतील तर मंत्रिपदी राहून फायदा काय, असा सवाल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला होता.

सामाजिक न्यायमंत्री बडोले आणि उज्ज्वल उके यांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. ऊके निर्णयांची अंमलबजावणी करत नसल्याची तक्रार बडोलेंनी फडणवीसांकडे सातत्याने केली होती. उकेंची बदली वस्त्रोद्योग िवभागात करण्यात आली. बडोले व उकेंप्रमाणे बापट व दीपककुमार यांच्यामधून िवस्तव जात नव्हता.काही महिन्यांपासून डाळीवरून उठलेल्या वादंगामुळे अन्न व नागरी पुरवठा िवभागाचे तीन तेरा वाजले होते. दीपक कुमारांना कौशल्य िवभागाचे प्रधान सचिव करण्यात आले आहे. रामदास कदम व पर्यावरण िवभागाच्या सचिव मिलन शंकर यांचा तर आपसातील संवादच बंद होता. अापले कुणी ऐकतच नसल्यामुळे कदम प्रचंड संतापले होते. तसे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलूनही दाखवले. दुसरीकडे तावडेंच्या उच्च िशक्षण िवभागाचे सचिव म्हणून सीताराम कुंटे यांची िनयुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्र्यांच्या सचिवांिवषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी जात होत्या. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हे सारे होत असावे, असेही काही मंत्री खासगीत बोलताना िदसत होते.

तुकाराम मुंडे नवी मुंबईत
सोलापूरचे वादग्रस्त जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांचे लोकप्रतिनिधींशी अजिबात पटत नव्हते. त्यांची बदली व्हावी यासाठी सातत्याने मागणी होत होती. त्याचे पडसाद िवधानसभेतही उमटले होते. मुख्यमंत्र्यांचा त्यांना पाठिंबा असल्याने बदली होत नसल्याची कुजबुज सुरू होती. अखेर त्यांची बदली नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली.

सीताराम कुंटे उच्च व तंत्रशिक्षणाचे सचिव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच िदवशी राज्यातील तब्बल ७३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अादेश काढले अाहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्याची गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. काही वादग्रस्त अधिकाऱ्यांची उचलबांगडी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवाहाबाहेर राहिलेल्या काही अधिकाऱ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात अाणले असल्याची अधिकारी वर्तुळात चर्चा आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, बदल्या झालेले अधिकारी व त्यांना िनयुक्ती मिळालेले पद