आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकलांग अपत्यांच्या मातांना ७३० दिवस बालसंगोपन रजा, मुख्यमंंत्र्यांनी दिली मान्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विकलांग मूल असलेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना आणि काही विशेष प्रकरणांत पुरुष कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संपूर्ण सेवेत ७३० दिवसांची विशेष बालसंगोपन रजा लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मान्यता दिली. ही रजा दिल्यामुळे विकलांग अपत्य असलेल्या माता-पित्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

विकलांग व्यक्तींसाठी असलेल्या (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्य समन्वय समितीच्या शिफारशी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...