आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Hours Traffic Block For Dismantling Of Hancock Bridge At Mumbai

रविवारी मुंबईला येणार असाल तर जरा थांबा!150 लोकल, 42 रेल्वे रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रविवारी मुंबईला येण्याचा िवचार करीत असाल तर थांबा... मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट राेड स्थानकाजवळ हँकाॅक पूल ताेडण्याचे काम शनिवारी रात्री हाती घेण्यात येणार अाहे. त्यामुळे रविवारी १८ तासांचा रेल्वेचा महाब्लाॅक होणार अाहे. त्यामुळे १५० लाेकल तर लांबपल्ल्याच्या ४२ गाड्या रद्द हाेणार अाहेत.

मुंबईहून सुटणाऱ्या १० जानेवारीच्या रद्द गाड्या : भुसावळपॅसेंजर, इंद्रायणी सुपर फास्ट एक्सप्रेस, इंटरसिटी, डेक्कन , काेयना, िसंहगड, नंदिग्राम एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, सह्याद्री, पंचवटी सुपरफास्ट, राज्यराणी, अमरावती, लातूर एक्सप्रेस, साेलापूर, पंढरपूर पॅसेंजर, साईनगर शिर्डी पॅसेंजर, गाेरखपूर स्पेशल.

मुंबईसाठी जानेवारीच्या रद्द गाड्या : पंढरपूरमुंबई पॅसेंजर, साईनगर शिर्डी पॅसेंजर, साेलापूर एक्सप्रेस, नंिदग्राम एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, लातूर एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस, गाेरखपूर मुंबई स्पेशल.

मुंबईसाठी १० जानेवारीला सुटणाऱ्या या गाड्या रद्द : िसंहगडएक्सप्रेस , राज्यराणी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन , पंचवटी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, भुसावळ मुंबई पॅसेंजर, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस.

१० जानेवारीला मुंबईत पोहोचणाऱ्या गाड्यांचे थांबे बदलले : अमृतसरएक्सप्रेस सीएसटी जाता ठाणे येथेच संपेल. अन्य रेल्वेगाड्यांचा प्रवासही त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या स्थानकांवर संपेल. मंगलाेर एक्सप्रेस पनवेल, हुसेनसागर एक्सप्रेस दादर, काेकणकन्या पनवेल, िसद्धेश्वर दादर, विदर्भ एक्सप्रेस ठाणे, महालक्ष्मी एक्सप्रेस ठाणे, नागपूर दुरांताे एक्सप्रेस दादर, पंजाब मेल ठाणे, सेवाग्राम एक्सप्रेस दादर, हैदराबाद एक्सप्रेस ठाणे, चेन्नई एक्सप्रेस दादर, कन्याकुमारी पुणे, हावडा मेल मनमाड, देवगिरी एक्सप्रेस कल्याण, काेलकाता मेल मनमाड, पुष्पक नाशिक राेड, िगतांजली ठाणे, तपाेवन एक्सप्रेस नाशिक राेड.
१० जानेवारीला सीएसटीहून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या स्थानकांवरून सुटतील. तपाेवन एक्सप्रेस : नाशिकराेड, पुष्पक एक्सप्रेस नाशिक राेड, कन्याकुमारी एक्सप्रेस पुणे, हावडा मेल मनमाड, देवगिरी एक्सप्रेस कल्याण.