आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग: सहलीसाठी आलेल्या इंजिनिअरिंगच्या 8 विद्यार्थ्यांचा समुंद्रात बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग- सहलीसाठी आलेले कर्नाटकातील बेळगावच्या मराठा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७ विद्यार्थी व एका प्राध्यापकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी येथे अरबी समुद्रात बुडून शनिवारी सकाळी मृत्यू झाला.
 
सहलीस आलेल्या ४७ त्यापैकी ३० विद्यार्थी वायरी किनाऱ्यावर पोहायला गेले होते. तीन जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आले असून १९ विद्यार्थी सुरक्षित पोहून किनाऱ्यावर पोहोचले. मृतांमध्ये ५ विद्यार्थी व ३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. समुद्रात उंच लाटा सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी समुद्रात खोलवर पोहायला जाण्याची आगळीक केली. त्यापैकी काही जण बुडायला लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी अन्य विद्यार्थी समुद्रात उतरले. परंतु तेव्हा खूपच उशीर झालेला होता. मुजमीन अनिकेत, किरण खांडेकर, आरती चव्हाण, अवधूत, नितीन मुत्नाडकर, करुणा बेर्डे, माया कोले, प्राध्यापक महेश अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व बेळगावचे आहेत. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...