आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील ८४ टक्के जोडप्यांना हवाय लाँग ड्राइव्हचा रोमांच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नापूर्वीचे एकमेकांच्या सहवासात घालवलेले धुंद क्षण संसाराच्या धबडग्यात निसटले असतील. तरीही ते क्षण पुन्हा जगण्याची म्हणजेच जोडीने मोटारबाइकवरून ‘लाँग ड्राइव्ह’ चा रोमांच पुन्हा अनुभवण्याची इच्छा चक्क ८४ टक्के जोडप्यांनी व्यक्त केली आहे.
देशातील ८४ टक्के जोडप्यांनी परस्परांमधील त्या दिवसांमधील नातेसंबंध पुन्हा अनुभवता यावे, अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे ‘बजाज डिस्कव्हर आणि आयएमआरबी’ यांनी संयुक्तपणे केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. पूर्व भागात हे प्रमाण ९७, उत्तरेत ९४ तर दक्षिण आणि पश्चिम भागात हे प्रमाण अनुक्रमे ८९ आणि ९२ टक्के असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. विवाहाअगोदर आणि नंतरच्या पती-पत्नींमधले नातेसंबंध डोळ्यासमोर ठेवून देशातल्या विविध शहरांमधील एक हजार जोडप्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये या जोडप्यांच्या आयुष्यात दुचाकीचे महत्त्व यावरही प्रकाशझोत पडला असल्याचे बजाज ऑटोचे विपणन प्रमुख सुमीत नारंग यांनी सांगितले.

जाेडपी म्हणतात
५८ % कामाच्या अतिरिक्त तणावामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही :
५० % परस्परांना सरप्राइज किंवा गिफ्ट देण्याचे प्रमाण घटले आहे.
९३ % पुरुष
९४ % महिला
वैवाहिक जीवनात गुरफटल्यानंतरही आधीचा आनंद अनुभवण्यास उत्सुक.

जोडप्यांच्या आवडी
सिनेमा बघणे, एकत्र जेवण किंवा घरगुती सहवासापेक्षाही मोटार सायकलवरून लाँग ड्राइव्हला जाणे जोडप्यांनी पसंत केले आहे. त्यातूनही बाइकवर बिलगून सफर करण्याचा अनुभव घ्यायचा असतो. त्यामुळे ४५ % जोडप्यांची बाइकवर रोमांचक क्षणांचा आनंद घेण्याची इच्छा आहे.

या शहरांमध्ये झाले सर्वेक्षण : मुंबई, पुणे, अहमदाबाद, इंदूर, दिल्ली, चंदिगड, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, कोची, हैदराबाद, कोलकाता, भुवनेश्वर.

रोमान्स मागे पडतोय
विवाहानंतरच्या काही महिन्यांच्या काळात जोडप्यांमधील रोमांचक अनुभूती विलक्षण असते, परंतु जसा जसा काळ पुढे सरकतो, जबाबदा-या वाढतात तसा रोमान्स मागे पडतो. या सत्याबद्दलची दक्षता सर्वेक्षणात दिसून येते.
डॉ. निशा खन्ना, विवाह समुपदेशक