आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत 9 वर्षीय मुलीवर 65 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- साकीनाका परिसरात 9 वर्षीय मुलीवर 65 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर भागात ही घटना घडली.मोहम्मद हुसेन पटेल असे या 65 वर्षीय आरोपीचे नाव असून, तो कचरा वेचण्याचे काम करतो.

 

सात दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीबरोबर मोहम्मदने दुष्कृत्य केले. यानंतर आरोपीने त्याच्या मूळ गावी म्हणजे सोलापुरात पळ काढला होता. या दरम्यान अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीने घडलेला प्रकार पीडित मुलीच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...