आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कक्ष अधिका-याच्या घरी ९० वादग्रस्त फाइल्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महसूल खात्याच्या एका 'अर्थपूर्ण’ व्यवहारासंबंधीच्या चौकशीसाठी कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी लाचलुचपत विभागाने माजी मंत्री सुरेश धस यांच्या बी/७ या मंत्रालयासमोरील बंगल्यावर छापा मारला. छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे धस यांचा महसूल कक्ष अधिकारी संजय सुराडकरांच्याही घरात वादग्रस्त फाइल्स आढळून आल्या आहेत.

महसूल खात्याशी संबंधित एका प्रकरणात सुराडकरसह वैभव आंधळे आणि दहिवाले या तीन व्यक्तींना अटक करण्यात आल्यानंतर सुराडकरांचे घर तसेच धस यांच्या बंगल्यावर छापे टाकण्यात आले. आंधळे हा या एजंट म्हणून काम बघत होता. तो धस यांच्या आष्टी मतदारसंघातील असल्याचे सांगण्यात येते.
माझा संबंध नाही : धस
या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. माझे नाव यात कसे आले, हे कळायला मार्ग नाही. मला आणखी काही बोलायचे नाही, असे सुरेश धस यांनी सांगितले.