आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवादाचे माध्यम बदलले, डिजिटलसाठी मराठी साहित्य उपलब्ध करुन द्यावे -CM फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) - एकविसाव्या शतकातील मूल्यांप्रमाणे मराठी भाषेची अाता ज्ञानभाषा म्हणून रचना करण्याची गरज अाहे. त्यासाठी शाश्वत मूल्ये साेडण्याचे कारण नाही. बायाेटेक्नाॅलाॅजी, स्पेस यांसारख्या विषयांना मराठी ज्ञानभाषा जाेडली पाहिजे. असे झाले तर मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत, अशा तक्रारी किंवा त्या शाळा जगवा म्हणून अार्जव करण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी साहित्याबद्दलची  गाेडी नव्या पिढीमध्ये निर्माण झाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. हे साहित्य वाचण्याची गाेडी लागली की ती कमी हाेत नाही. पण त्याच वेळी एक गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे की, माध्यमे बदलली अाहेत. पुस्तकांइतके शाश्वत माध्यम दुसरे असू शकत नाही. त्याची सवय लाेकांनी ठेवली पाहिजे. अभिव्यक्ती व संवादाचे माध्यम बदलून ती जागा डिजिटलने घेतली अाहे. त्यामुळे या माध्यमासाठी  मराठी साहित्य सहजपणे उपलब्ध करून दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद््घाटनप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील अाणि अन्य मान्यवर उपस्थित हाेते. मुख्यमंत्री अाणि रंगमंचावरील मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात अाले.

अॅपचा वापर व्हावा
अाज अनेक प्रकारचे अॅप विकसित हाेत असून त्या माध्यमातून साहित्यापर्यंत पाेहचता येते.  अॅपसारखे तंत्रज्ञान अतिशय साेप्या पद्धतीने  पाेहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभिव्यक्तीचे माध्यम बदलल्यास मराठी साहित्य बहुजनांपर्यंत पाेहचू शकेल, अशी खात्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

लर्निंग आऊटकम वाढले
राज्यात अजूनही ३० ते ३५ टक्के मुलांचे लर्निंग अाऊटकम कमी अाहे. पण १७ हजार मराठी शाळांचे लर्निंग अाऊटकम शंभर टक्के केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमातल्या  खासगी शाळा साेडून त्या विद्यार्थ्यांनी  जिल्हा परिषदेचा दाखला घेतला. हा डिजिटल उपक्रमाचा सर्वात माेठा फायदा असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

... पुन्हा बेळगाव!
मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच प्रेक्षकांमधील बेळगावी प्रतिनिधींनी ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घाेषणा सुरू केल्या. मुख्यमंत्र्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे  याबद्दल  दुमत नाही. प्रेक्षकांनी या मागणीला टाळ्या वाजवून अनुमाेदन द्यावे’ असे सांगून अापल्या भाषणाला सुरुवात केली.
 
मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे - मुख्यमंत्री 
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा घोषणा काही लोकांनी दिल्या. या घोषणांना माझा पाठिंबा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- मराठीतील साहित्य हे फक्त भारतीय भाषांमध्ये नाही तर जगभरातील भाषांमध्ये गेले पाहिजे. मराठीत नोबेल पुरस्कार मिळेल असे साहित्यिक आहेत. मात्र ते जगभरातील भाषेत गेलेच नाही तर ते शक्य नाही, हे मान्य आहे. 

- मराठी शाळा जगल्या पाहिजे ही मागणी योग्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस म्हणाले, मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे.
- मराठी शाळा या देशात 18 क्रमांकावरुन  तिसऱ्या क्रमांकवर आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अजून बराच पल्ला गाठायचा अशी पुस्तीही मुख्यमंत्र्यांनी जोडली.
- मराठी साहित्याची गोडी नवीन पिढी मध्ये निर्माण झाली पाहिजे. 
- साहित्य हे बहुजनांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशीही इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
- चीन, कोरिया, जपान यांनी संपूर्ण तंत्रज्ञान हे स्वतःच्या भाषेत निर्माण केले. असे मातृभाषेतील तंत्रज्ञान हे लवकर आत्मसात होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
- सरकारम्हणून ज्या पद्धतीने आम्ही साहित्यक्षेत्राच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे तसे राहाता येत नाही, याची खंत व्यक्त केली.
- यापुढे असे होणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
- मराठी ज्ञान भाषा होणार नाही तोप्रयंत ती समृद्ध होणार नाही. तंत्रज्ञान हे मातृभाषेत आले तर संर्वांगीन विकास होण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 
 
संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे नागपूरकर आहेत. संमेलनाचे उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर आहेत. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष नागपूरकर आहेत. यामुळे डोंबिवली आणि नागपूर हा वेगळा सेतू निर्माण होत असल्याचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे म्हणाले. 138 वर्षांत प्रथमच एका ज्ञाती संस्थेला संमेलनाचे यजमानपद मिळाल्याबद्दल वझेंनी मंडळाचे आभार व्यक्त केले.

छिंदवाड्याला विदर्भात सहभागी करुन घ्या - विष्णू खरे
आम्हाला महाराष्ट्रात सामील करुन घ्या, अशी मागणी हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली.  
 - ज्येष्ठ हिंदी साहित्यिक खरे यांनी, आता परंपरा नष्ट होत चालल्याची खंत व्यक्त केली. हिंदी आणि मुस्लिम धर्मातही परंपरा संपत चालल्याचे ते म्हणाले. 
 - हिंदी आणि मराठी या भाषा भगिनी आहेत. मराठीतील साहित्य हिंदीत आले पाहिजे. हिंदीतील मराठीत आले पाहिजे. ही साहित्याची देवाण-घेवाण होण्याची गरज खरेंनी व्यक्त केली. 
हिंदीतील प्रसिद्ध साहित्यिक विष्णू खरे यांनी हिंदी साहित्यात नागपूरचे महत्त्व यावर आपले विचार व्यक्त केले. खरे म्हणाले, गजानन माधव मुक्तीबोध हे हिंदी साहित्याचे शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक होते. त्यांच्याशिवाय हिंदी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. मुक्तिबोध यांनी नागपूरमध्ये वास्तव्य केले होते. 
- छिंदवाड्यातील बहुतांश बुद्धीजीवी हे मराठी आहेत. विविध पक्षांमध्ये मग ते काँग्रेसमधे असतील किंवा भाजपमधे असतील ते सर्व मराठी आहेत. 
- मुख्यमंत्री महोदय फडणवीसजी तिम्ही विदर्भाचे आहात. आमची मागणी आहे की छिंदवाड्याला तुम्ही विदर्भाशी जोडून घ्या. आम्ही मध्यप्रदेशात वैतागलो आहोत, आम्हाला महाराष्ट्रात घ्या. 
संमेलनासाठी डोंबिवली नगरी सजली आहे. सकाळी ग्रंथदिंडीने डोंबिवली नगरी दुमदुमली होती. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 89व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली नाही तर बुद्ध, सॉक्रॅटिस, चार्वाक यांनी दिलेले सत्य - शब्द प्रदान केले. 

मावळत्या अध्यक्षांनी अक्षयकुमार काळे यांना नाही दिले अध्यक्षपदाचे सुत्र 
'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची सही घेऊन या' अशी अग्रही मागणी मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
- पश्चिम महाराष्ट्राने विदर्भ, मराठवाड, खानदेशावर अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी केली. 
- विदर्भाचा सवतासुभा निर्माण होऊ नये अशीही विनंती सबनीसांनी केली.
- दाभोलकर, पानसरे हे सत्याची पूजारी होते. त्यांचे मारेकरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये सुटले. त्यांच्या निधनाने विवेकी महाराष्ट्रात अजूनही अक्रोश आहे. 
- मावळत्या अध्यक्षांनाही ठार मारण्याची धमकी मिळाली होती. त्यांना महाराष्ट्र शासनाने सशस्त्र पोलिस बंदोबस्त दिला होता, त्याचे ऋण व्यक्त करीत सबनीस म्हणाले, 'महाराष्ट्रात भाषण आणि चर्चा करताना पोलिस संरक्षण घ्यावे लागते हे शोभनीय नाही.'
- महात्मा गांधीचा मारेकरी गोडसे या एका ब्राम्हणामुळे बहुजन समाज प्रत्येक ब्राम्हण व्यक्तीकडे संशयाने पाहातो. 
- जाती-जातींमधील जातियवाद संपवण्यासाठी शुद्ध सांस्कृतिक प्रबोधनाची गरज असल्याचे सबनीस म्हणाले.
- नथुराम गोडसे प्रवृत्तीचा विरोध कायम करीत राहाणार याचा पुनरुच्चार करत सबनीस म्हणाले, माझ्यावर गोळ्या चालल्या तरी मी सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणत राहाणार. मी डावाही नाही आणि उजवाही नाही, असेही ते म्हणाले.
- अक्षयकुमार काळे यांना सूत्र देणार नाही तर, बुद्ध, सॉक्रॅटिस, चार्वाक यांनी दिलेले सत्य प्रदान करतो शब्द प्रदान करतो असे ते म्हणाले. 
  
- 365 पुस्तकांचे स्टॉल साहित्य नगरीत उभारण्यात आलेले आहेत. 
- कल्याण-डोंबिवलीच्या 1 लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
- प्रत्येकाने एक तरी पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे. 
- साहित्य संमेलनाच्या 90 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संमेलनाच्या मांडवाखाली गझल संध्या होणार आहे. 
 
'देवेंद्र फडणवीस हे उत्तम कवी'
- महाराष्ट्रात 270 ते 340 साहित्य संमेलने होतात. असेही म्हटले जाते की साहित्य संमेलन हे रिकामटेकड्यांचा उद्योग असल्याची टीका होते. मात्र साहित्य हे अनेकांना रोजगार निर्माण करुन देणारे क्षेत्र असल्याचा दावा, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला. 
- 1933 साली नागपूरमध्ये झालेल्या संमेलनात दत्तो वामन पोतदार यांनी ठराव केला होता. 82 वर्षांपासून आपण मराठी विद्यापीठ मागत आहोत. अजून ते मिळत नाही. 
- मराठी ही ज्ञानभाषा झाली तर ती जिवंत राहिल असा धोकाही त्यांनी यावेळी मांडला. 
महामंडळ काय करते ? हा प्रश्न सर्वत्र विचारला जातो याचे उत्तरही अध्यक्षांनी दिले. त्यासोबतच केवळ सरकारच्या आश्रयावर राहून चालणार नाही तर या संस्थेला लोकाश्रय मिळण्याची गरज व्यक्त केली. 
- देवेंद्र फडणवीस हे उत्तम कवी असल्याचे गुपितही मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले. 
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा विकास होणे गरजेचे असल्याचे जोशी म्हणाले. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे फोटो.... संमेलनासाठी सज्ज झाली साहित्यनगरी... 
बातम्या आणखी आहेत...