आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य कुरआन, पैगंबरांवरील मराठी पुस्तके खरेदीची सामान्यांसह साधुसंतांमध्ये उत्सूकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य कुरअान पाहाताना साधु-संत. - Divya Marathi
दिव्य कुरअान पाहाताना साधु-संत.
पु.भा.भावे साहित्यनगरी (डोंबिवली) - सुबोध कुरआन, दिव्य कुरआन, मुहम्मद यांचे बोधवचन, पैगंबर मुहम्मद ही आहेत मुस्लिम विचारवंताची पुस्तके. 90व्या मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात इस्लामिक विचारवंतांच्या या पुस्तकांमध्ये काय आहे हे पाहाण्यासाठी मराठी वाचकांची गर्दी होत आहे. मुस्लिम साहित्य म्हटले की ते उर्दूमध्येच असणार, असा सर्वसाधारण समज. मात्र रा.चिं. ढेर ग्रंथग्राममध्ये इस्लामी तत्व, कुराण आणि इस्लामी बाबींविषयी मराठीत लिहिलेली व अनुवादित केलेल्या पुस्तकांचा मोठा स्टॉल आहे.
 
मुंबईतील भायखळा येथील इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टच्या या स्टॉलमध्ये सुमारे 260 हून अधिक इस्लामी विचारवंतांनी मराठीत लिहिलेली पुस्तके आहेत. केवळ कुरआन किंवा इस्लामिक विचार यावरच या पुस्तकांचा भर नाही तर, त्यात इस्लाममध्ये स्त्रियांचे स्थान, व्याज आणि कर्ज यासंबंधीचे इस्लामी तत्वज्ञान, व्याजमुक्त बँकिंग असे विविध विषयांवरील पुस्तके आहेत. 
 
औरंगाबाद येथून आलेले उमर यांनी सांगितले, की सर्वसामान्यांना कुराणात काय लिहिले आहे हे वाचायला आवडते. 89 व्या साहित्य संमेलनात मराठीत भाषांतरीत दिव्य कुरआनच्या 2000 प्रतिंची विक्री झाली होती. 
- स्टॉलला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे जुन्या मुल्यांसह नव्या आणि विचारांची पुस्तके आहेत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणकोणते ग्रंथ आहेत मराठीत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...