आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 95th Belgaon Maratahi Natyasamelan Going On From Tomarrow

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेळगाव नाट्यसंमेलन हे मराठींची एकजूट दाखविण्याचे ठिकाण- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेळगावमध्ये होणारे मराठी नाट्यसंमेलन हे वाद घालण्याचे नव्हे तर मराठी लोकांसाठी एकजूट दाखविण्याचे ठिकाण आहे. तेथे वाद होतील असे वागू नका व नाट्यसंमेलन निविघ्नपणे कसे पार पडेल यासाठी प्रयत्न करा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 95 वे नाट्यसंमेलन बेळगाव मुक्कामी बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत उद्यापासून दिमाखात सुरु होणार आहे. या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
बेळगावातील सीपीएड ग्राऊंड येथे बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी सज्ज झाली असून 60 वर्षांनंतर बेळगावात नाट्यसंमेलन होत असल्याने बेळगावकरांमध्ये प्रचंड उत्साह व कुतुहल असल्याचे चित्र दिसून येते. नियोजित अध्यक्ष फय्याज शेख यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्‍या या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक साठे आहेत.
उद्या सकाळी (शनिवार) सकाळी होणार्‍या उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार उदय सामंत, किरण ठाकूर उपस्थित राहतील. तर रविवारी ८ फेब्रुवारी रोजी समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नाट्यसंमेलनाच्या आयोजनात मध्यंतरी अस्थिरतेचे सावट आले होते. त्यावेळी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर हे सावट दूर झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी बेळगावकर नाट्यरसिक उत्सुक आहेत.
उद्या (शनिवारी) दुपारी नाट्यसंमेलनाध्यक्ष फय्याज शेख यांची प्रगट मुलाखत व गप्पा होणार असून त्यांची मुलाखत पत्रकार जयंत पवार घेणार आहेत. अरुण काकडे, आशालता वाबगांवकर, मोहन जोशी, दीपक करंजीकर, अशोक देशपांडे यांचाही सहभाग यात आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी बेळगावनगरीतून नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी परिसंवाद, चर्चा या कार्यक्रमांऐवजी नाट्यप्रयोग होणार असून एकांकिका, नाट्यसंगीत, बालनाट्ये, प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही होणार आहेत.