आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९८४ पदवीधारकांची हमाल हाेण्याची इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात सरकारी हमालांच्या पाच जागांसाठी चक्क ९८४ पदवीधरांसह ५ एमफिलधारक तरुणांनी अर्ज केले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे चौथी उत्तीर्ण ही या पदांसाठी किमान शैक्षणिक अर्हता आहे. ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मार्फत भरली जात आहेत.

एमपीएससीचे सचिव राजेंद्र मंगरुळकर म्हणाले की, हमालांच्या ५ पदांसाठी एकूण २,४२४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ड श्रेणीतील या पदांसाठी येत्या आॅगस्टमध्ये परीक्षा होऊ शकते. डिसेंबर २०१५ मध्ये एमपीएससीने यासाठी जाहिरात दिली होती. त्यासाठी १८ ते ३३ वर्षांची वयोमर्यादा होती. लेखी परीक्षेत उमेदवारांचे भाषिक ज्ञान व हिशेबाची क्षमता जोखण्यात येईल.

अशी उडाली झुंबड
०५ - एमफिलधारक
९८४ - पदवीधारक
०९ - पीजी डिप्लोमा
१०९ - डिप्लोमाधारक
२५३ - पदव्युत्तर
६०५ - बारावी पास
२८२ - दहावी पास
१७७ - दहावीच्या आत
बातम्या आणखी आहेत...