आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अायसीसीकडून आता 104 देशांना टी-20 चा अधिकृत दर्जा; पाच वर्षांत पाच वर्ल्डकप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -आयसीसीच्या सदस्य देशांकडून टी-२० लीग क्रिकेटच्या परवानगीची मागणी वाढली असून त्यामुळे निर्माण झालेले आव्हान पेलवण्यासाठी व कसोटी क्रिकेट व एकदिवसीय क्रिकेटचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे कोलकाता येथील आयसीसीच्या बैठकीत निश्चित झाले. सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा कल आपापल्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचा असावा या दृष्टीने आयसीसीने पावले उचलली आहेत.

 

आयसीसीने टी-२० क्रिकेटला अधिकृत दर्जा देऊन आपल्या अधिपत्याखाली आणले असून जागतिक स्तरावर क्रमवारीही निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२०  क्रिकेटच्या वाढत्या जागतिक लोकप्रियतेचा क्रिकेटच्या विकासासाठी वापर करून या छोटेखानी क्रिकेटवर अंकुश ठेवण्यासाठी नवे निकषही निश्चित करण्याचे आयसीसीने ठरवले आहे. येत्या १ जुलैपासून सर्व महिला संघांची टी-२० क्रिकेटची क्रमवारी निश्चित करण्यात येईल. १ जानेवारी २०१९ पासून सर्व पुरुष संघांची टी-२० क्रिकेटची क्रमवारी निश्चित करण्यात येईल.  आयसीसीच्या २०२०च्या टी-२० विश्वचषक पात्रतेसाठीच्या कामगिरीचा निकष ऑक्टोबर २०१८ (महिलांसाठी) व मे २०१९ (पुरुषांसाठी) निश्चित होईल.  

 

आयसीसीने कसोटी क्रिकेटच्या घसरत्या लोकप्रियतेला रोख लावण्यासाठी आणि सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा सहभाग कसोटी क्रिकेटमध्ये अनिवार्य करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या असून कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धांचा अंतिम सामना २०२१ व २०२३ मध्ये ठेवला आहे.

 

गैरवर्तनासाठी नियम अधिक कठाेर 
खेळाडूंच्या मैदानावरील वर्तणुकीसाठीची आचारसंहिता अधिक कठोर करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. चेंडू कुरतडणे, एकमेकांबाबत खेळाडूंचे आकसाने वागणे, अर्वाच्य शिवराळ भाषा, पंचांच्या निर्णयावर जाहीर नाराजी आणि बाद खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवणे या गुन्ह्यांसाठीची शिक्षा, दंड अधिक कठोर करण्याचा निर्णय मैदानावर आणि मैदानाबाहेरचे खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे वागणे आदराचे आणि सद््गृहस्थासारखे असणे याचाही नव्या आचारसंहितेमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

 

पाच वर्षांत वर्ल्डकपची पर्वणी :  २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यामध्ये आयसीसीच्या या स्पर्धा असतील. यात पाच वर्ल्डकपचा समावेश अाहे. 

 

वनडे विश्वचषक - २०१९ व २०२३   
विश्वचषक टी - २० २०२० व २०२१   
कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामना - २०२१ व २०२३  
कसोटी चॅम्पियनशिप पहिला टप्पा - २०१९ व २०२१  
कसोटी चॅम्पियनशिप पहिला टप्पा - २०२० व २०२३  
 
 टी-२० क्रिकेट - हा स्थानिक पातळीवर उत्तम पर्याय असला तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट हेच सर्वोत्तम खेळाडूंसाठी आकर्षण राहिले पाहिजे यावरही सर्वांचे एकमत झाले. त्यावर विचारमंथन करण्यासाठी व उपाययोजना सुचवण्यासाठी एका कार्यकारी गटाची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली. या वर्षाअखेरीस या गटाने सुचवलेल्या सूचनांवर विचार होईल.
बातम्या आणखी आहेत...