आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील 136 पाणीपुरवठा योजनांत भ्रष्टाचार- पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठवाड्यातील १३६ पाणीपुरवठा योजनांमध्ये ११.६६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तारांकित प्रश्नांच्या उत्तरात दिली. यामध्ये औरंगाबादमधील २३, परभणी ६०, नांदेड ६, उस्मानाबाद २, बीड ४४ व लातुरातील एका योजनेचा समावेश आहे. कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांनी विभागीय बैठकीच्या अहवालातून ही बाब समोर आली असून या प्रकरणी केलेल्या कारवाईचे स्वरूप काय आहे, अशी विचारणा तारांकित प्रश्नाद्वारे केली होती.  त्याला दिलेल्या लेखी उत्तरात लोणीकर यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...