आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 20 हजार संगणक परिचालकांचा अाज मुंबईत माेर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गावोगावच्या ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकारच्या माध्यमातून नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध करून देणारे संगणक परिचालक सोमवारी (दि. ५) आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकणार आहेत.

 

गेल्या आठ महिन्यांपासून संगणक परिचालक विनामोबदला काम करत असून शासनाने येत्या  अर्थसंकल्पात मानधनाबाबत ठोस तरतूद करावी,  अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राणीबाग (भायखळा) ते आझाद मैदान (सीएसटी) मार्गावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.  हिवाळी अधिवेशनावर परिचालकांनी मोर्चा काढला होता.

 

त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकाला आपले सरकार सेवा केंद्रात सामावून घेण्यात येईल, निश्चित मानधन देण्यात येईल व ते वेळेवर देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...