आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे: ‘ब्लॅक फ्रायडे’तून पडद्यावर घडले बाॅम्बस्फाेटाचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हॉलिवुडमध्ये अमेरिकेत घडलेल्या महत्वाच्या घटनांवर  चित्रपट तयार करून कलेच्या अंगाने एक दस्तावेज तयार केला जातो. आपल्याकडे असा गंभीर प्रयत्न न होता, केवळ मनोरंजनाकडे लक्ष ठेऊन चित्रपट तयार केले जातात. मुंबईवर अतिरेकी अजमल कसाब आणि त्याच्या अतिरेकी साथीदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर रामगोपाल वर्माने तद्दन मसालेपट काढला होता. परंतु १९९३ च्या बॉम्बस्फोटावर अनुराग कश्यपने ‘ब्लॅक फ्रायडे’नावाने चित्रपट तयार केला होता. 


पत्रकार- लेखक हुसैन झैदी यांनी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेवर “ब्लॅक फ्रायडे’नावाने एक कादंबरी लिहिली होती. याच कादंबरीवर आधारित अनुराग कश्यपने चित्रपटाची निर्मिती केली. खरे तर या कादंबरीवरून एका वाहिनीसाठी मालिका बनवण्याचा विचार सुरु होता आणि त्यासाठी अनुरागला स्क्रिप्ट लिहिण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्या वाहिनीने मालिका बनवण्याचा  निर्णय ऐनवेळी रद्द केलं. त्यानंतर चित्रपटाची योजना आखण्यात आली. त्यासाठी अनुरागने एक वर्ष संशोधन केले. न्यायालयात जाऊन बॉम्बस्फोटाचे कामकाज पाहिले आणि त्यानंतरच प्रत्यक्ष पटकथा लिहिली. वास्तव घटनेवर आधारित या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने तब्बल तीन वर्ष प्रदर्शनाची परवानही नाकारली. मात्र त्याच वेळी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट प्रचंड गाजत राहिला.  चित्रपटाचा खेळ संपल्यावर स्टॅन्डिंग ओव्हेशन मिळत गेले. अनेक  महोत्सवांत  चित्रपटाला पुरस्कारही मिळाले.  अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच चित्रपट प्रदर्शित होऊ शकला होता. साडे सहा कोटी रुपये खर्चाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. याच चित्रपटात  नवाजुद्दीन सिद्दिकीने टायगर मेमनच्या सेक्रेटरीची असगर मुकादमची भूमिका केली होती.  ‘ब्लॅक फ्रायडे’मघ्ये गँगस्टरची भूमिका साकारणारा नवाजु्द्दीन अाता बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे.

बातम्या आणखी आहेत...