आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे: न्यायाची 25 वर्षे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- १ एप्रिल १९९४ ला खटल्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर १२ वर्षांनी सप्टेंबर २००६ मध्ये १२ दोषींना फाशी आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर गेल्याच वर्षी न्यायालयाने ताहिर मर्चंट आणि  फिरोज अब्दुल राशिद खानला फाशीची व अबु सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

 

भा रताच्या इतिहासात प्रथमच १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासही घटनेइतकाच  २५ वर्षांचा कालावधी लागला.  प्रारंभी मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला सीबीआयकडे वर्ग करण्यासच सरकारने आठ  महिने लावले. सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर ५ महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल १९९४ ला टाडा कोर्टात खटल्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर १२ वर्षांनी सप्टेंबर २००६ मध्ये टाडा न्यायालयाने पहिला निकाल दिला,ज्यात १२ दोषींना फाशी आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर गेल्याच वर्षी न्यायालयाने या प्रकरणात ताहिर मर्चंट आणि  फिरोज़ अब्दुल राशिद खानला फाशीची आणि अबू सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  मात्र पोर्तुगालमधून अबू सालेमला हस्तांतरित करण्यात आले असल्याने त्याला २५ वर्षांपेक्षा जास्त काळ आपले न्यायालय तुरुंगात ठेऊ शकत नाही आणि फाशीची शिक्षाही देऊ शकत नाही. यात रियाज सिद्दीकीला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एक आरोपी मुस्तफा डोसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. आणि दाऊद अजूनही फरारच आहे. अमेरिकेतील ट्विन टॉवरवर झालेल्या हल्ल्याचा एफबीआयने लगेचच शोध सुरु केला आणि एका वर्षाच्या आतच ४ मार्च १९९४ ला सहा आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली. सहापैकी चार आरोपींना २४० वर्षांची शिक्षा अमेरिकन न्यायालयाने ठोठावली.

 

बातम्या आणखी आहेत...