आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- १२ मार्च १९९३ च्या स्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला. या बॉम्बस्फोटात अंडरवर्ल्डचा हात असल्याचे समोर आले होते. मात्र, बॉम्बस्फोटाला २५ वर्ष पूर्ण होत असतानाच एकेकाळी दहशत माजवणारे मुंबईतील गुन्हेगारी विश्वही क्रमाक्रमाने प्रभावहिन होत गेल्याचे असल्याचे दिसून येत आहे.
बॉम्बस्फोटाअाधीच डाॅन दाऊद इब्राहिम प्रथम दुबई आणि नंतर पाकिस्तानला पळून गेला आणि तेथून अंडरवर्ल्डचे काम पाहू लागला. परंतु बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी ‘मकोका’ कायद्याच्या मदतीने अंडरवर्ल्डचे कंबरडेच मोडून काढले. त्यातले काही गुन्हेगार पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अलिकडेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकरसह अनेकांना पकडले आणि अंडरवर्ल्डची जी काही दहशत होती तिलासुद्धा एका अर्थाने पूर्णविराम मिळाला.
८०-९० च्या दशकात अंडरवर्ल्डला बॉलिवूडमधून मोठी खंडणी मिळत असे. अनेकदा तर बॉलिवूडमधील लोक कमाईच्या जवळपास ५० टक्के रक्कम रोखीने अंडरवर्ल्डला देत. परंतु कालांतराने कॉर्पोरेट कंपन्या चित्रपट तयार करीत गेल्याने अंडरवर्ल्डला बॉलिवूडकडून मिळणारा पैसाही बंद झाला आणि अंडरवर्ल्डची चित्रपटांमधली गुंतवणूकही घटत गेली. मधल्या काळात बिल्डर लॉबीकडून मिळणाऱ्या खंडणीवरही चाप बसत गेला. कालांतराने नोटाबंदीमुळे खोट्या नोटांचा धंदा बंद बसला व सोन्याची तस्करीही जवळ-जवळ बंद झाली. आताचे चित्र असे आहे की, एकेकाळी मुंबईवर राज्य करणारा न अरुण गवळी नेता होऊनही विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहे. छोटा राजनही तुरुंगात आहे. फारुख टकल्या पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर दाऊदला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू अाहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.