Home | Maharashtra | Mumbai | 25 years of Mumbai blasts: investigative officer Suresh Walishetty

दाऊद दूरच, इतरांना शिक्षा करणेही कठीण; तपास अधिकारी सुरेश वालीशेट्टी यांचे मत

दिव्‍य मराठी | Update - Mar 12, 2018, 06:13 AM IST

‘काहीही झाले तरी दाऊद भारतात परतेल असे मला अजिबात वाटत नाही,’ असे स्पष्य मत १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्य

  • 25 years of Mumbai blasts: investigative officer Suresh Walishetty

    मुंबई- ‘काहीही झाले तरी दाऊद भारतात परतेल असे मला अजिबात वाटत नाही,’ असे स्पष्य मत १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्याचे तपास अधिकारी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुरेश वालीशेट्टी यांनी व्यक्त केले. आता २५ वर्षांनंतर खटल्यातील जे आरोपी परत येत आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणे हेदेखील मोठे आव्हान असेल, असे मतही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. बारा बॉम्बस्फोट.. तब्बल २५७ मृत्यू, दहा हजार पानांचे आरोपपत्र, १८९ एकूण आरोपी, २३ जणांची निर्दोष सुटका, १२ जणांना फाशी, २० जणांना मरेपर्यंत जन्मठेप, जवळपास ७० जणांना १४ ते एक वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास आणि दाऊद, टायगरसह २७ फरार आरोपी.. असा हा ‘महाकाय’ खटला ज्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने तपास करत उभा केला, त्या पथकाचे नेतृत्व सुरेश वालीशेट्टी करत होते. ते वालीशेट्टी म्हणाले की, ‘या खटल्यात ३० वेगवेगळ्या प्रकरणांचा आम्ही छडा लावला. या खटल्याची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की शेकडो साक्षीदार आणि आरोपींच्या संख्येमुळे पहिला खटला सुरू झाल्यापासून शेवटच्या आरोपीच्या शिक्षेपर्यंतचा कालखंड हा तपास यंत्रणा म्हणून आमची परीक्षा पाहणारा होता. त्यामुळे आज जे आरोपी भारतात परतत आहेत, त्यांच्यावरील खटला चालवून त्यांची दोषसिद्धी करणे सोपे नाही. कारण आता अनेक साक्षीदार किंवा अधिकारी मृत झाले आहेत. नव्या पथकातील अधिकारी जुन्या तपासाच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असू शकतात, अशा अनेक अडचणी या प्रक्रियेत असल्याने हे मोठे अवघड काम आहे. इक्बाल कासकर पुराव्याअभावी सगळ्या आरोपांपासून निर्दोष सुटला आणि दाऊदच्या सगळ्या मालमत्तांचा मालक बनून बसला,’ असे वालीशेट्टी नमूद करतात.

    दाऊदच्या अाधी टायगर मेमन हाती लागणे महत्त्वाचे
    दाऊदला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू अाहेत का? या प्रश्नावर वालीशेट्टी म्हणाले की,‘दाऊद आणि टायगर मेमन भारतात कधीच परत येणार नाहीत असे मला वाटते. कारण दाऊद तपास यंत्रणांच्या हाती लागला तर आपले कारस्थान उघड होईल अशी पाकिस्तानला भीती अाहे. त्यामुळे ते तसे हाेऊ देणार नाहीत. शिवाय दाऊद इब्राहिमचा या प्रकरणात थेट हस्तक्षेप असल्याचे सिद्ध करायचे असल्यास अगोदर टायगर मेमनच्या तोंडून ते वदवून घ्यावे लागेल. कारण बाॅम्बस्फोट घडवणारे प्रत्यक्ष आरोपी आणि दाऊद यांच्यामधला दुवा हा टायगर होता. टायगर वगळता दाऊद या प्रकरणातील कुणाच्याही थेट संपर्कात दाऊद नव्हता. त्यामुळे दाऊदवरील आरोप सिद्ध करावयाचा झाल्यास टायगर मेमन हा अगाेदर हाती लागणे गरजेचे अाहे.

Trending