Home | Maharashtra | Mumbai | 25 years of Mumbai blasts: Sanjay Dutt

मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे: संजय दत्तही खलनायक

दिव्‍य मराठी | Update - Mar 12, 2018, 06:28 AM IST

मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या चौकशीत अभिनेता संजय दत्तला अाराेपींनी शस्त्रे दिल्याची माहिती उघडकी

  • 25 years of Mumbai blasts: Sanjay Dutt

    ​मुंबई- मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या चौकशीत अभिनेता संजय दत्तला अाराेपींनी शस्त्रे दिल्याची माहिती उघडकीस आली होती. पोलिसांनी संजय दत्तच्या घरातून ३ एके-५६ रायफल, ९ मॅगझीन, ४५० गोळ्या, एक ९मिमी ची पिस्तूल आणि २० बॉम्ब जप्त केले. त्यानंतर १९ एप्रिल १९९३ रोजी संजय दत्तला नाट्यमयरित्या एअरपोर्टवरच अटक करण्यात आली...

    मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी अनेक महिने आधीच तयारी केली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, आरडीएक्स आणण्यात आले होते. अबू सालेम, मुसा चौहान आणि समीर हिंगोरा यांनी त्यातली एके ५६ ही आधुनिक रायफल आणि काही हातबॉम्ब अभिनेता संजय दत्तला लपवून ठेवण्यासाठी दिली होती. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या चौकशीत संजय दत्तला शस्त्रे दिल्याची माहिती उघडकीस आली होती. पोलिसांनी संजय दत्तच्या घरातून ३ एके-५६ रायफल, ९ मॅगझीन, ४५० गोळ्या, एक ९मिमीची पिस्तूल आणि २० बॉम्ब जप्त केले. त्यानंतर १९ एप्रिल १९९३ रोजी संजय दत्तला नाट्यमयरित्या एअरपोर्टवरच अटक करण्यात आली. तो महेश भटच्या गुमराह चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी मॉरिशस येथे गेला होता. संजय बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक ११७ होता. टाडा अंतर्गत त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि तो दोषी सिद्ध झाल्याने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. या दरम्यान वडील सुनील दत्त यांनी मुलाच्या सुटकेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मदतीचे साकडे घालून पाहिले. पुढे २०१६ मध्ये संजय दत्त समाधानकारक वर्तुणुकीमुळे विहित शिक्षेच्या कालावधीपेक्षा आधीच तुरुंगातूून सुटला. त्याने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याचा ‘भूमी’नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तो या घडीला दोन चित्रपटांमध्ये काम करीत आहे. पडद्यावर आणि पडद्याबाहेर अतिशय नाट्यमय जीवन जगलेल्या संजय दत्तच्या आयुष्यावर राजकुमार हिरानी चित्रपट तयार करीत अाहेत. रणबीर कपूरची मध्यवर्ती भूमिका असलेला हा चित्रपटही यंदाच्या वर्षी पूर्ण होऊन प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Trending