आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ६ टन प्लास्टिक जप्त, ३ लाखांचा दंड वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लास्टिकवर बंदी आल्याने मुंबईच्या मासळी बाजारात रविवारी महिलांनी मासे घेण्यासाठी स्टीलचे डब्बेच सोबत आणले होते. - Divya Marathi
प्लास्टिकवर बंदी आल्याने मुंबईच्या मासळी बाजारात रविवारी महिलांनी मासे घेण्यासाठी स्टीलचे डब्बेच सोबत आणले होते.

मुंबई- प्लास्टिक बंदी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मुंबईतील ७२ दुकानांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर हाेत असल्याचे दिसून अाले. येथून अधिकाऱ्यांनी ५९२ किलाे प्लास्टिक पिशव्या जप्त करून ३ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. 


राज्य सरकारने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मुंबर्इत २६९ निरीक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर रविवारपासून बंदीच्या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. दरम्यान, प्लास्टिक बंदीचे दुकानदारांनी स्वागत केले असली तरी नेमकी बंदी काेणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर अाहे, या संदर्भात काेणतीही माहिती देण्यात अाली नाही. पण सरसकट हाेत असलेल्या कारवाईमुळे दुकानदार अाणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. 


प्लास्टिक बंदीवरून राजकारण नकाे : पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन 
प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गाचे आणि नागरिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत अाहे. त्यामुळे भविष्यातील धाेका टाळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे अावाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले अाहे. प्लास्टिक बंदीसंदर्भात सर्वसामान्य जनतेची काळजी जेवढी तुम्हाला अाहे तेवढीच अाम्हालाही अाहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी वरून राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

अनेक ठिकाणी कारवाई 
- मालेगावात १५ हजारांचा दंड वसूल. 
- परभणीत तिघांकडून १५ हजार रुपये वसूल 
- नंदुरबारमधील नवापुरात ७७ किलाे प्लास्टिक जप्त 
- चाळीसगावमध्ये २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल.

 
"मातोश्री'बाहेर मनसेची विराेधात्मक पाेस्टरबाजी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्लास्टिक बंदीच्या दंडाला विराेध केला अाहे. त्यामुळे रविवारी मनसेकडून 'माताेश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासाबाहेर प्लास्टिक बंदीच्या दंडाला विराेध करणारे फलक लावण्यात अाले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...