आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा मुंबईत Plane Crash होतानाचा Video, कोसळताच बॉम्बस्फोटासारखा झाला विध्वंस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुरुवारी घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाचा दुर्घटनाग्रस्त होतानाचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या व्हिडिओतून झालेल्या विध्वंसाची कल्पना येते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत रहिवासी भागापासून विमान दूर नेल्याने मोठी जीवित हानी टळली होती. या दुर्घटनेत 5 जणांना प्राण गमवावे लागले होते. 

 

टेस्ट ड्राइव्ह बेतली जिवावर

तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान जमिनीवर उतरवण्याशिवाय वैमानिकासमाेर पर्याय नव्हता. मात्र, तरीही प्रसंगावधान राखत दुर्घटनाग्रस्त विमान निवासी इमारतीपासून दूर उतरवून मोठी जीवित हानी टाळल्याबद्दल या विमानाच्या पायलट मारिया झुबेरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. को पायलट असलेल्या मारिया (४०) मुंबईतील मीरा रोडवर राहत होत्या. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील असून त्यांच्यामागे १५ वर्षांची मुलगी आहे. स्वत:च्या जिवाचे बलिदान देऊन त्यांनी अनेक निष्पापांचे प्राण वाचवले, अशी प्रतिक्रिया घाटकाेपरमधील नागरिकांतून व्यक्त हाेत हाेती. २८ डिसेंबर १९७० रोजी जन्मलेल्या मारिया झुबेरी यांचा विवाह प्रभात कथुरिया यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक १५ वर्षांची मुलगी आहे. मारिया यांच्याकडे एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. मारिया यांच्यासोबत सुरभी (३५) या तंत्रज्ञ महिलेचाही मृत्यू झाला आहे. 

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकाॅप्टरला रायगड व भाईंदर येथे अपघात झाले होती. ती हेलिकाॅप्टर्स व आणि घाटकोपर येथे दुर्घटनाग्रस्त झालेले विमान हे दाेन्हीही यूवाय एव्हिएशन प्रा. लि. कंपनीचेच आहेत. 
- पायलट मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी दुर्घटनेला यूवाय कंपनीच्या सीईओंना जबाबदार धरले. हवामान खराब असताना त्यांनी उड्डाण करण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला. 
- जुहूवरुन विमानाने १२.२० वाजता उड्डाण केल्यानंतर ४ नाॅटिकल मैलावर त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. 
- विमानाचे इंजिन फेल झाल्यास नियंत्रण कक्षाला विशिष्ट मेसेज येतो. या विमानाकडून असा मेसेज प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती आहे. 
- दुर्घटनाग्रस्त विमान २०१४ पर्यंत उत्तर प्रदेश सरकारचे होते. त्याच वर्षी ते युवाय कंपनीला विकले हाेते.

 

व्हिडिओ सौजन्य: ANI

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या दुर्घटनेचे आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...