आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक महिन्याचा शेवट: पुन्हा लगीनघाई, येत्या 18 जूनपासून विवाह मुहूर्त उपलब्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दर तीन वर्षांनंतर येणारा अधिकमास विविध नावांनी ओळखला जातो, या मलमास किंवा अधिकमासची समाप्ती दर्श अमावास्येच्या दिवशी झाली. सोबतच येत्या 18 जूनपासून पुन्हा विवाह मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, अधिकमास संपताच लगीनघाई सुरू झाल्याचे चित्र शहरभरात दिसू लागले आहे.  

 

जून महिन्याचे 12 दिवस अधिकमास तर, उर्वरित लगीनघाईत जाणार आहेत. अधिक महिन्यात लग्नकार्य केली जात नाहीत. त्यामुळे येत्या 18 जूनपासून पुन्हा विवाह मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. 


या दरम्यान 21, 23, 25, 27, 28 जून या दिवशी विवाह मुहूर्त आहेत. दरम्यान, बाजारपेठेमध्ये अधिक महिन्यामध्ये चांदी खरेदीसाठी गर्दी पहायला मिळत होती. हीच लगबग आता लग्नासाठी धावाधाव करणाऱ्यांची दिसत आहे. अनेक रखडलेल्या तारखा मार्गी लागण्यासाठी हे दिवस महत्त्वाचे असतात. या परिस्थितीत हॉटेल्स आणि फार्म हाउसवर विवाहांना पसंती मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येणारे हे सुरुवातीचेच मुहूर्त महत्त्वाचे समजले जातात. यानंतर दिवाळीदरम्यान येणाऱ्या मुहूर्तांना महत्त्व असते. त्यामुळे शक्यतो याचदरम्यान लग्नांसाठी लगबग दिसून येते. 

 

अधिक महिन्याचा शेवट हा या लग्नमुहूर्तांच्या सुरुवातीचा संकेत असतो. तसेच, या महिन्यात खरेदी केलेल्या मौल्यवान वस्तू पुढील लग्न मुहूर्तांसाठी शुभशकून मानले जातात. त्यामुळे अधिकमास आणि पुढील मुहूर्तांचे महत्त्व कायम असते. 

बातम्या आणखी आहेत...