आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलादपूरमध्ये व-हाडाचा टेम्पो दरीत कोसळला, चौघांचा मृत्यू तर 15 हून अधिक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे व-हाडाचा एक टेम्पो 50 फूट दरीत कोसळून बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. यात किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 हून अधिक जण जखमी आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

याबाबतची माहिती अशी की, पोलादपूर येथे एका साखरपुड्यासाठी व-हाडाचा टेम्पो गेला होता. पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावाजवळ हा टेम्पो आला असता तो 50 फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत तीन जण जागीच मृत पावले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

भिकू तुकाराम मालुसरे (एरंडवाडी), पांडुरंग धोंडू बीरमणे (आडावळे), अनिकेत अनंत सकपाळ (पार्टेकोंड) आणि जिजाबाई केशव पार्टे (पार्टेकोंड, पोलादपूर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...