आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हम्प्टी शर्मा..' फेम अॅक्टर सिद्धार्थ शुक्लाच्या BMWने 3 वाहनांना दिली धडक, 4 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही अॅक्टर सिद्धार्थ शुक्लाची BMW कार शनिवारी संध्याकाळी अनियंत्रित होऊन रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांना धडकली आणि दुभाजकावर चढली. सूत्रांनुसार, अॅक्टर सिद्धार्थ नशेत होता. या दुर्घटनेनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत 4 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गाड़ी स्वत: सिद्धार्थच चालवत होता. जखमींना गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

सिद्धार्थलाही झाली दुखापत:
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात शनिवार संध्याकाळी 6 वाजता मुंबईच्या श्रीजी हॉटेलजवळ झाला आहे. अपघातावेळी सिद्धार्थची कार भरधाव वेगात होता. यात सिद्धार्थच्या कारसहित 3 वाहनांचे नुकसान झाले आहे. सिद्धार्थलाही दुखापत झाली आहे. ओशिवारा पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. लवकरच त्याची चौकशी होईल.

 

अनेक मालिकांमध्ये भूमिका: 
सिद्धार्थने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटात अंगदचा रोल केला होता. सिद्धार्थने दिल से दिल तक, लव्ह यू जिंदगी, आहट, जाने पहचाने से ये अजनबी यासारख्या मालिकांमध्ये काम केलेले आहे. अनेक रिअॅलिटी शोजचाही तो भाग राहिलेला आहे. बिग बॉस, खतरों के खिलाड़ी, इंडियाज गॉट टॅलेंट, कॉमेडी क्लासेस, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांत त्याला प्रेक्षकांनी पाहिलेले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या दुर्घटनेचे आणखी Photos.. 

 

बातम्या आणखी आहेत...