आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीमुळे दोन मुलींची तस्करी रोखण्यात यश, दोघींना पाठविण्यात येत होते अमेरिकेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलूनमधून वाचविण्या आलेल्या मुली आणि या मुलींना वाचविणाऱ्या अभिनेत्री प्रिती सूद. - Divya Marathi
सलूनमधून वाचविण्या आलेल्या मुली आणि या मुलींना वाचविणाऱ्या अभिनेत्री प्रिती सूद.

मुंबई- वर्सोवा येथून एका अभिनेत्रीच्या सर्तकतेमुळे एका 11 वर्षाच्या आणि एका 17 वर्षाच्या मुलीला देह व्यापाराच्या रॅकेटपासून वाचविण्यात यश आले आहे. या दोन्ही मुलींना देशाच्या बाहेर पाठविण्यात येत होते. या अभिनेत्रीने योग्य वेळी ही माहिती पोलिसांना दिली आणि या दोघींना वाचविण्यात यश आले.

 

 

या अभिनेत्रीला आला होता संशय
- वर्सोवा पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री प्रीति सूद या आपल्या एका मित्रासोबत 4 मार्च रोजी एका सलूनमध्ये गेल्या होत्या.
- त्यावेळी त्यांच्या नजरेस या दोन मुली पडल्या. या मुलीचा मेकअप करण्यात येत होता. त्या अल्पवयीन असल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
- तेथे दोन व्यक्ती होत्या. त्या वारंवार घडयाळ पाहत होत्या आणि त्रस्त होत्या. या व्यक्ती वारंवार कोणाशीतरी फोनवर बोलत होत्या.
- त्या वारंवार अमेरिकेला जाण्याविषयी बोलत होत्या. संशय आल्याने त्यांनी याबाबत सलून चालकास विचारले तेव्हा त्याने त्यांना बाहेर देशात नेण्यात येणार असल्याचे सांगितले.

असे वाचविण्यात आले मुलींना
- त्यानंतर या मुलींशी गुपचूप चर्चा केल्यावर त्या गुजरातमधून आल्याचे त्यांनी सांगितले.
- त्यानंतर हे युवक या मुलींना घेऊन जाऊ लागल्यावर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली.
- पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले की या मुलींना एक लाख रुपयांत खरेदी करण्यात आले होते. त्यांना वेश्याव्यवसायासाठी अमेरिकेत पाठविण्यात येत होते.

 

 

आणखी काही जणांना होऊ शकते अटक
- पोलिसांनी याप्रकरणी आमिर आणि ताजुद्ददीन खान या दोघांना अटक केली आहे. ते एका आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य आहेत. 
- पोलिसांना यात अनेक हाय-प्रोफाईल लोक सामील असल्याचा संशय आहे. त्यामुळे आणखी काही जणांना अटक होऊ शकते.

 

 

कंगनासोबत काम केले आहे प्रीति सूद यांनी
- अभिनेत्री प्रीति सूद यांनी 2014 मध्ये रिव्हॉल्वर राणी या चित्रपटात कंगना रनौत सोबत काम केले आहे.
- प्रितीने या शिवाय मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रातही काम केले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...