आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी मंत्रालयात, या विषयावर करणार चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचे नेते व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. शिवसेनेकडे खाते असलेल्या पर्यावरण खात्याने या महिन्यात प्लॅस्टिक बंदी केली आहे. याची अंमलबजावणी कशी करायची या विषयावर या दोघांत चर्चा होणार आहे. 

 

महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. पर्यावरण खाते शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याकडे आहे. राज्यातील प्लॅस्टिक बंदी व्हावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. मात्र, सध्या राज्यातील संपूर्ण प्लॅस्टिक बंदी होऊ शकलेली नाही. राज्यात टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्लॅस्टिक बंदी करण्यात येणार आहे. सध्या पाण्याच्या बॉटल, दुधाची पिशवीसह विविध खाऊ विकल्या जाणा-या पदार्थासाठी प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे.

 

प्लॅस्टिक असोसिएशनने सरकारच्या प्लॅस्टिक बंदीविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने प्लॅस्टिक बंदी उठवण्यास नकार दिला. त्यामुळे हे असोसिएशन सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांविरोधात तीन महिन्यांपर्यंत कारवाई करण्यास मनाई करतानाच उत्पादकांच्या सूचनांवर राज्य सरकारनेही विचार करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

 

प्लास्टिक बंदीबाबत कोणतेही पूर्व नियोजन न करता अत्यंत घाईगडबडीत हा निर्णय घेतल्याचा आरोप प्लास्टिक उत्पादकांनी केला आहे. राज्यात पन्नास हजार लघु आणि मध्यम स्वरूपाचे प्लास्टिक उत्पादक असून हा निर्णय लागू राहिल्यास या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या जवळपास चार लाख लोकांचे रोजगार हिरावून घेतले जातील. सोबतच प्लॅस्टिकचा पुर्नवापर करणे शक्य असताना सरकार ते करता सरसकट बंदी घालत आहे ते चुकीचे आहे असे असोसिएशनने म्हटले आहे. यावर, सरकारने आपले म्हणणे व बाजू मांडावी असेही कोर्टाने पर्यावरण विभागाला आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मोठी वाजतगाजत प्लॅस्टिक बंदी घातली असली तरी त्याची अंमलबजावणी करणे फार जिकीरीचे ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरण, निसर्ग, प्रदूषण, शहरी समस्या आदी विषयात रस असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागून सरकार अंमलबजावणी कशी करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या भेटीत पर्यावरण विभागाचे अधिकारी माहिती देणार आहेत. 

 

प्लॅस्टिक बंदीने 4.5 लाख लोक बेरोजगार?

 

प्लॅस्टिक बंदीमुळे 4. 5 लाख रोजगारांवर कु-हाड आली आहे. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकचा विविध प्रकारे पुर्नवापर शक्य आहे. यामुळे आधी तसे धोरण आणा. यावर सरसकट बंदीची गरजच नाही, असे महाराष्ट्र प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनचे म्हणणे आहे. राज्य सरकारने 1 एप्रिलपासून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...