Home | Maharashtra | Mumbai | Allegation on Long March on Social Media that it was Sponsored

लाँग मार्च कोणी स्पॉन्सर केला! असे विचारणाऱ्यांना या जखमा दिसल्या नाहीत का!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 14, 2018, 08:35 AM IST

खरंच लोकांची संवेदनशीलता संपत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

 • Allegation on Long March on Social Media that it was Sponsored

  मुंबई - शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईत पोहोचल्यानंतर सरकारला जाग आली. तातडीने त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर शेतकरी आपआपल्या घरी निघाले. पण अजून सगळे शेतकरी त्यांच्या घरीही पोहोचले नसतील तर त्यांचे हे आंदोलन स्पॉन्सर्ड असल्याचे म्हटले जातेय. सोशल मीडियावर एका अकाऊंटवरून तसा आरोप करणारा सवाल उपस्थित करण्यात आलाय. जवळपास 180 किलोमीटरची पायपीट करून शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या. पण या जखमा पाहूनही लोकांना जर अशा प्रकारचे प्रश्न विचारावे वाटत असतील तर खरंच लोकांची संवेदनशीलता संपत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

  ट्वीटरवर केली पोस्ट...
  संभाजी भिडे नावाच्या एका ट्वीटर अकाऊंटवरून ही खोडसाळ पोस्ट करण्यात आली आहे. हे अकाऊंट संभाजी भिडे यांचे फॅन अकाऊंट असल्याचे ट्वीटरवर म्हटले आहे. या अकाऊंटवरून सोमवारी उशीरा एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये या लाँग मार्चसाठी 1.44 कोटींचा खर्च आला. तो कोणी स्पॉन्सर केला असा थेट प्रश्नच विचारण्यात आला आहे. म्हणजे कोणीतरी पैसा खर्च करून हे आंदोलन उभारले अशा थेट आरोप करण्याचा प्रयत्न यात करण्यात आलाय.

  खर्चाचा हिशेबही दिला...
  या ट्वीटर पोस्टमध्ये खर्चाचा हिशेबही देण्यात आला आहे. 20 हजार टोप्या, 10 हजार झेंडे त्याच्या किमती असा हिशेब लावत त्यावर किती खर्च झाला हे पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. त्याशिवाय रोजच्या जेवणावर होणाऱ्या खर्चाचा हिशेत तब्बल सव्वा कोटी असल्याचे यात म्हटले आहे. पण या गरीब शेतकऱ्यांनी जागोजागी बसून चटणी भाकरी खाल्ली हे त्याला दिसलेले नसावे. एकूणच अत्यंत चीड आणणारे हे ट्वीट शेतकऱ्यांच्या पायांना झालेल्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.

  हजारो लाईक आणि कमेंट..

  विशेष म्हणजे ट्वीटरवरील या पोस्टला हजारो लाईक आलेले आहेत. कमेंटही आहेत. करण्यात पोस्ट करणाऱ्यांनी तर विकृतपणा केलाच. पण किमाल त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी जरा विचार करायला हवा.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, लाँग मार्च स्पॉन्सर होता म्हणाणाऱ्यांना चपराक लगावणारे आणखी काही PHOTO.. अखेरच्या स्लाइडवर ट्वीटचा स्क्रीन शॉट..

 • Allegation on Long March on Social Media that it was Sponsored

  एखाद्याने स्पॉन्सर केलेल्या मोर्चात लोक एवढं सहन करतात का.

 • Allegation on Long March on Social Media that it was Sponsored

  लोकांनी मोर्चेकऱ्यांना खाण्याचे पदार्थ आणि पाणी वाटले, त्याचा हिशेब लावायचे विसरले वाटतं. 

Trending