आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना भेटला आमीर, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा साहेबांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता आमीर खान राज्यातील ग्रामीण भागांमध्ये असलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे काम करत आहे. लोकसहभागामुळे चळवळ बनलेल्या या कामाविषयी माहिती देण्यासाठी  अभिनेता आणीर खानने गुरुवारी आपल्या सहकाऱ्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी परावांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

शरद पवार यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून आमीर खानबरोबर झालेल्या या भेटीची माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी आमीर खान यांना शुभेच्छा देत मदतीचे आश्वासन दिले. त्याचबरोबर त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले. यापैकीच एक मोलाचा सल्ला म्हणजे पाणी फाऊंडेशनच्या कामात विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्याचा. 


काय म्हणाले पवार..
शरद पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, आमीर खान यांनाही मी असे सुचवले आहे की रयत शिक्षण संस्थेसारख्या असंख्य शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांचा या कार्यात सहभाग करून घ्यावा. जेणेकरून त्यांना पाणी संवर्धनाबाबत रूची निर्माण होईल, तसेच त्यांचे याबाबत शिक्षण होईल.


अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण
पवारांच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यासाठी अनेक प्रयोग केले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही भरपूर पाणी लागणाऱ्या ऊसाबाबत प्रयोग केले आहेत. पाटातून सोडण्यात आलेलं पाणी बरचसं वाया जातं, शिवाय त्यामुळे बिनकामाचे तण सुद्धा माजतात. त्याऐवजी ऊसाच्या केवळ मुळांना मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी योजना केल्यास फायदेशीर ठरते. मी आमिर खान आणि त्यांच्या टीमला एॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावेळी मी स्वतः उपस्थित राहून त्यांना इथले काम दाखवेन, असेही पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...