आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छामरणासाठी ज्येष्ठ दाम्पत्याचे राष्ट्रपतींना पत्र, म्हटले-कोणीही जबाबदारी घेऊ नये अशी इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी देण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याला काहीही गंभीर आजार नाही. पण त्यांचे म्हणणे आहे की, या वयात ते समाजासाठी काहीही करू शकणार नाहीत. त्यामुळे इच्छा मरणाची मागणी केली आहे. या काळात इतर कोणी आमची जबाबदारी घ्यावी असे आम्हाला वाटत नाही, असे राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. 


कोण आहे हे दाम्पत्य.. काय लिहिले पत्रात? 
- पत्रात या ज्येष्ठ दाम्पत्याने लिहिले आहे की, लग्नाच्या पहिल्या वर्षी आम्हाला बाळ झाले नाही त्यामुळे आम्ही बाळ न होऊ देण्याचा निर्णय घेतला. आमच्या कुटुंबातही कोणीही नाही. वय झाल्यानंतर इतर कोणी आमची जबाबदारी घ्यावी, असे आम्हाला वाटत नाही. 
- लवाटे दाम्पत्याने पुढे लिहिले की, टर्मिनली इल (आजारामुळे शरिराचे अवयव बंद पडणे) असल्याने समाजासाठी आता काही करता येणार नाही. 
- इरावती यांनी लिहिले की, माझे दोन ऑपरेशन झाले. मला कुठेही एकटीला जाता येत नाही. व्यवस्थित बसताही येत नाही. माझ्या जीवनात  आता काही उद्देशही शिल्लक नाही. 


अॅक्टिव युथनेशिया म्हणजे काय?
अॅक्टीव्ह युथनेशियामध्ये सामान्यपणे पेन किलरचा ओव्हरडोस दिला जातो. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे भारतात इच्छामरणाला परवानगी नाही. 


सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे याचिका 
- इच्छामृत्यूबाबत सर्वात पहिली चर्चा 2011 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी 38 वर्षांच्या कोमात असलेल्या केईएमच्या नर्स अरुणा शानबाग यांना इच्छामरण देण्यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आळी होती. 
- अरुणा शानबाग यांच्यावर 1973 मध्ये रुग्णालयातील एका वार्ड बॉयने बलात्कार केला होता. त्याने अरुणा यांच्या गळ्याला एक साखळी बांधली होती. त्यामुळे अरुणा कोमामध्ये केला. नंतर त्या ठिक झाल्याच नाही. 
- त्यानंतर 42 वर्षे त्या कोणात राहिल्या. त्यांची अवस्था पाहून त्यांच्यासाठी इच्छा मरणाची एक याचिका करण्यात आली होती. पण कोर्टाने ती फेटाळली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...