आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर नाणार प्रकल्प गुजरातला- मुख्यमंत्र्यांचा शिवसेना व राणेंना निर्वाणीचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाणार प्रकल्पापासून कोणतेही नुकसान नाही. कोकणातील शेती, आंबे आदीवर प्रदुषणाचा परिणाम होईल हा गैरसमज पसरविला जात आहे. रिफायनरी प्रकल्पापासून कसलाही धोका नाही. गेल्या 50 वर्षापासून मुंबईतील चेंबूरसारख्या गर्दीच्या भागात रिफायनरीचे काम सुरू आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीबाबतचा गैरसमज पसरविण्याचे काम थांबवावे अन्यथा हा प्रकल्पा गुजरातला जाईल. गुजरातने यापूर्वीच अराम्को कंपनीला निमंत्रण दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकार आणि अराम्को कंपनीत मागील आठवड्यात करार झाला. मात्र, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी व कोकणवासियांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. रिफायनरी आल्यास कोकणातील निसर्ग, शेती, आंबा फळभागा व मासेमारीचे मोठे नुकसान होईल अशी भीती दाखविली जात आहे. सोबतच शिवसेना, मनसे व नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने याला जाहीर व कडाडून विरोध केला आहे. 

 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ येत्या 20 एप्रिलला नाणार येथे भेट देणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांनीही 10 मे रोजीच्या नाणार दौऱ्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नाणारच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प थेट गुजरातला जाईल असे सांगत प्रखर विरोध केलेल्या शिवसेना व नारायण राणेंना इशारा दिला आहे. 

 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पात कच्चे तेल पक्के (शुद्ध) केले जाणार आहेत. यासाठी 3 लाख कोटींची गुंतवणूक अराम्को व तीन सरकारी तेल कंपन्यात करार झाला आहे. त्यानुसार अराम्को कंपनी 50 टक्के भागीदारी तर उर्वरित तीन सरकारी कंपन्यांची भागीदारी राहणार आहे. भारत सध्या 70 टक्के इंधन, तेल आयात करतो त्यामुळे देशाला याचा मोठा फायदा होणार आहे. सोबतच यातून थेट 1 लाख रोजगार तयार होणार आहेत. 

 

दरम्यान, हा तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प सरकारी असल्याने काही खासगी कंपन्यांनी व कार्पोरेट लॉबीने यात अडसर यावा यादृष्टीने प्रयत्न चालविल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विरोध करणा-यांनाही कार्पोरेटलॉबीची काही फूस तर नाही ना याची शहानिशा केली जात आहे.  

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...