आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना लागू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील १ नाेव्हेंबर २००५ राेजी किंवा त्यानंतर मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील १०० टक्के अनुदान असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन याेजना लागू करण्यात येत अाहे. यासाठी १ हजार २५८ काेटी ३३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात अाला अाहे. याचा फायदा सुमारे ५९ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हाेणार अाहे. या संबंधीचा निर्णय २८ फेब्रुवारी २०१८ राेजी सरकारकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर देताना दिली.  


या संंदर्भातील चर्चा  आमदार विक्रम काळे आणि श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित केली हाेती. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले,  १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. या प्रश्नांविषयी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

१००% अनुदान प्राप्तीच्या दिनांकापासून गृहीत  
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी ज्या शैक्षणिक संस्था विनाअनुदानित किंवा अंशत: अनुदानित तत्त्वावर  होत्या त्या संस्था १०० टक्के अनुदानावर येतील, त्या दिनांकास लागू असलेली निवृत्तिवेतन योजना शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहे. म्हणजेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी संस्था १०० टक्के अनुदानावर आली असेल तर जुनी सेवानिवृत्तिवेतन योजना व १ नोव्हेंबर २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आल्यास त्यांना नवीन परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजना लागू असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...