आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाचा हल्ला; गुन्हा दाखल, आरोपीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांच्यावर एका कॅब चालकाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी बेंगळुरूमध्ये घडली. हल्लेखोर कॅब चालकास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 इनोव्हा कारमधून स्मिता ठाकरे वनदुर्गा मंदिराकडून मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाल्या होत्या. त्यांच्या कॅबचा चालक दयानंद (वय 30) हा गाडी चालवत असताना मोबाइलवर बोलत होता. मोबाइलवर बोलण्याच्या नादात विमानतळ रोडवरील कवूर येथे त्याने अचानक गाडीचा ब्रेकही मारला. त्यामुळे स्मिता व त्यांच्या मैत्रिणीला जोरदार धक्का बसला. त्या गाडीतून पडता-पडता वाचल्या. या बेफिकीरीबद्दल स्मिता व त्यांच्या मैत्रिणीने कॅब चालकाला खडसावले. परंतु, याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. उलट त्याने त्यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. असभ्य भाषेचा वापर करत त्याने गळा पकडून त्यांना मारहाणही केली, असे पोलिसांनी सांगितले. स्मिता ठाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...