Home | Maharashtra | Mumbai | Autonomous weather centers will be a boon for farmers

स्वयंचलित हवामान केंद्रे शेतकऱ्यांना ठरतील वरदान; 2060 केंद्रे स्थापन, मुख्यमंत्र्यांची माहिती

वृत्तसंस्था | Update - May 21, 2018, 01:33 AM IST

हवामानाचा योग्य अंदाज न लावता आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करता याव

  • Autonomous weather centers will be a boon for farmers

    मुंबई - हवामानाचा योग्य अंदाज न लावता आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करता यावे तसेच हानी टाळता यावी यासाठी राज्यातील विविध महसूल विभागांत २०६० स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हवामानात वेळोवेळी होणारे बदल टिपून त्याची योग्य माहिती गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाेहोचवण्यासाठी हा उपक्रम असल्याचे ते म्हणाले. स्वयंचलित हवामान प्रणालीत गाव पातळीवरील हवामानाची माहिती दिली जाते.

    याच्या आधारे आपल्या भागात पाऊस पडणार की गारपीट होणार याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल आणि आवश्यक ते खबरदारीचे उपाय त्यांना करता येऊ शकतात. हवामानाची नवीन प्रणाली शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे फडणवीस म्हणाले. स्कायमेटच्या मदतीने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने हवामान केंद्रांची स्थापना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Trending