आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या इमारतीला आग; 90 जण सुखरुप बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्यासह अनेक सेलिब्रिटीज वास्तव्यास असलेल्या प्रभादेवी भागातील इमारतीला बुधवारी दुपारी आग लागली. ‘ब्यूमाँड’ नामक या इमारतीच्या ३३ मजल्यांवर घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.  


सुमारे ९० जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. ३३  व्या मजल्यांपर्यंत आगीच्या बंबांचा पाण्याचा मारा पोहोचण्यास अडथळा आल्याने काही काळ आग विझवण्यास काही प्रमाणात विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.  


दीपिका पदुकोनचे निवास, कार्यालय   
ब्यूमाँड इमारतीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे घर आणि कार्यालयसुद्धा आहे. या इमारतीच्या २६व्या मजल्यावर दीपिकाचा ४बीएचके फ्लॅट आहे. याशिवाय अनेक उद्योजकांची याच इमारतीमध्ये कार्यालयेसुद्धा आहेत. दरम्यान,  ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, आपण सुखरूप असल्याचे दीपिकाने ट्विटरवरून सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा आगीची भीषणता दर्शवणारे फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...