आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणेंचा राज्यसभेचा अर्ज, चेह-यावर दिसली नाराजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणेंच्या चेह-यावर नाराजी होती तर मुख्यमंत्री स्मितहास्य करताना दिसले. - Divya Marathi
नारायण राणेंच्या चेह-यावर नाराजी होती तर मुख्यमंत्री स्मितहास्य करताना दिसले.

मुंबई- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी अखेर नाईलाजाने का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, संसदीय मंत्री गिरीश बापट, राणेंचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.

 

यावेळी नारायण राणेंची नाराजी लपत नव्हती. नेहमीप्रमाणे राणे खूष दिसत नव्हते. राणे शांत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेह-यावर मात्र स्मित दिसत होते. नितेश राणे यांचाही चेहरा पडलेला होता.

 

केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनीही मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला. यावेळी मुरलीधरन यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज्यसभेचा अर्ज दाखल करताना कसा होता राणेंचा मूड....  

बातम्या आणखी आहेत...