आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकातही अाता भाजपचीच सत्ता येईल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांचे गरीब कल्याणाचे धोरण जनतेला भावल्यामुळे पूर्वोत्तर भारतातील जनतेने मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला विजयी केले आहे. त्रिपुराप्रमाणेच आगामी कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केला.  


त्रिपुरा व नागालँडमध्ये भाजपला मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले की, पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व त्रिपुरा, नागालँड मेघालयाच्या भाजप कार्यकर्त्यांचे महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो.

 

मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पूर्वोत्तर राज्यांच्या विकासावर भर दिला. त्या राज्यांसाठी अर्थसंकल्पात जादा तरतूद केली. त्या राज्यांमध्ये एकात्मतेचा भाव निर्माण केला. अमित शहा यांच्या कुशल संघटनकौशल्यामुळे तेथील संघटना बळकट झाली तसेच युवाशक्ती भाजपशी जोडली गेली.  मोदीजींचे नेतृत्व आणि भाजपबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना हा निवडणूक निकाल म्हणजे डोळ्यात झणझणीत अंजन आहे, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...