आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई10 वी : 500 पैकी 499 गुणांसह चार जण टॉपर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रखर मित्तल - Divya Marathi
प्रखर मित्तल

नवी दिल्ली - सीबीएसईने मंगळवारी १०वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला.पहिल्या तिन्ही स्थानांवर एकूण २५ विद्यार्थी असून यात १७ मुली व ८ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ५०० पैकी ४९९ म्हणजे ९९.८% गुणांसह चौघांनी अव्वल स्थान पटकावले आहे. यात डीपीएस गुरगावच्या प्रखर मित्तल, बिजनोरच्या (यूपी) आर.पी. पब्लिक स्कूलची रिमझिम अग्रवाल, शामलीच्या स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलची नंदिनी गर्ग आणि कोची येथील भवनी विद्यालयाच्या श्रीलक्ष्मी जी यांचा समावेश आहे.


सात विद्यार्थ्यांनी ४९८ गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले. तर, ११ विद्यार्थ्यांनी ४९७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. या वर्षी १६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात उत्तीर्णांचे प्रमाण ८६.७०% राहिले. मुलींची टक्केवारी ८८.६७ तर मुलांची ८५.३२% आहे. २७,४२६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांवर गुण मिळवले. तर, १,३१,४९३ जणांनी ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या तीन स्थानांवर असलेल्या २५ पैकी १२ विद्यार्थी उत्तर प्रदेशातील आहेत.

 

१० वर्षांनी गुण प्रणाली

२००७ नंतर यंदा प्रथमच टक्केवारी व गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. यापूर्वी बोर्ड सीसीई पद्धतीनुसार ग्रेडिंगद्वारे निकाल देत हाेते.

 

पुढील स्लाईडवर पहा, ९९.८% गुणांसह चौघांनी पटकावले अव्वल स्थान 

बातम्या आणखी आहेत...